IND vs WI: West Indies players wear black armbands in Delhi Test match! What is the reason? Read in detail
West Indies players wear black armbands: भारत आणि वेस्ट इंडिज यांकयात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी हाताला काळ्यापट्ट्या बांधल्याचे दिसून येत आहे. या मागील कारण म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी निधन झालेले माजी अष्टपैलू बर्नार्ड ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.
क्रिकेट वेस्ट इंडिजने शुक्रवारी एक निवेदन जाही केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “गेल्या आठवड्यात निधन झालेले माजी खेळाडू बर्नार्ड ज्युलियन यांच्या सन्मानार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. अष्टपैलू ज्युलियन १९७५ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.”
१९७० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या क्रिकेट उदयात बर्नार्ड ज्युलियन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. ज्युलियनने २४ कसोटी सामन्यांमध्ये ८६६ धावा आणि ५० बळी टिपले आहेत. त्याने १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८६ धावा आणि १८ बळी घेतले आहेत. १९७५ च्या विश्वचषकात, बर्नार्ड ज्युलियनने पाच सामन्यात १७.७० च्या सरासरीने १० विकेट्स मिळवल्या होत्या. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी चार विकेट्स मिळवल्या होत्या.
अष्टपैलू खेळाडू म्हणून क्रिकेट जगतात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या ज्युलियनने १९७३ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध १२१ धावांची सामना जिंकवून देणारी खेळी खेळली होती. एक उल्लेखनीय गोष्ट की, वेस्ट इंडिजने शेवटचा भारताविरुद्ध १९८७ मध्ये दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर कसोटी सामना खिशात घातला होता.
The West Indies players are wearing black armbands on day 1 as a tribute to former player Bernard Julien who passed away last week. Julien was a member of the 1975 World Cup winning team. #INDvWI | #MenInMaroon pic.twitter.com/XCTQh8TuIR — Windies Cricket (@windiescricket) October 10, 2025
अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४० धावांनी पराभव केला होता. वेस्ट इंडिज आता दूसरा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. हा सामना अनिर्णित राहिला तरी भारत ही मालिका आपल्या खिशात घालणार आहे.
हेही वाचा : सामन्यात झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉला मिळाले या संघात स्थान! वाचा सविस्तर
भारतीय संघाकडून या सामन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, वेस्ट इंडिज संघाने मात्र आपल्या संघात दोन बदल केले आहे. ब्रँडन किंग आणि जोहान लायन सामन्यातून बाहेर पडले असून त्यांच्या जागी अँडरसन फिलिप आणि टेविन इमलाच यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.