Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs KKR  : आज कोण ठरणार वरचढ? अजिंक्यसेना करणार धोनी सेनेशी दोन हात, जाणून घ्या A टू Z  माहिती.. 

आयपीएल २०२५ चा २५ वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य राहाणे आणि सीएसकेचा कर्णधार धोनी या दोघांचा कस लागणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 11, 2025 | 02:51 PM
CSK vs KKR: Who will emerge victorious today? Ajinkya Sena will clash with Dhoni Sena, know A to Z information..

CSK vs KKR: Who will emerge victorious today? Ajinkya Sena will clash with Dhoni Sena, know A to Z information..

Follow Us
Close
Follow Us:

CSK vs KKR  : आयपीएल २०२५ चा २५ वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात खेळला जाणार आहे. हा सामना ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून चेन्नई घरच्या मैदानावर विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर दुसरीकडे, कोलकाता संघ जिंकण्यासाठी उत्सुक असणार आहे. असेल. गेल्या सामन्यात कोलकात्याला ४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

कोलकाता नाईट रायडर्सन संघाने ५ पैकी २ सामने जिंकले आहेत. कोलकाता संघ पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर विराजमान आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने ५ पैकी ४ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.  एका विजयासह चेन्नई पॉइंट टेबलमध्ये तळाशी म्हणजे 9 व्या स्थानावर आहे. या सामन्यात चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणारा  आहे.

हेही वाचा : DC vs RCB : ‘हे माझे मैदान आणि मला..’ आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर KL Rahul चा हुंकार, सेलिब्रेशनही चर्चेत, पहा Video

चेन्नईचा खेळपट्टीचा रिपोर्ट

एम.ए. चिदंबरम हे मैदान फिरकीपटूंना अनुकूल मानले जाते. या मैदानावर जास्त गुण मिळवणे बहुतेक संघांसाठी अवघड मानले जाते.  चेन्नईची खेळपट्टी संथ असून ती फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त  मानली जाते. जर फलंदाजांनी सुरुवातीलाच वेगवान सुरुवात दिली तर संघ २०० धावांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

हवामानाचा अंदाज काय?

आज चेन्नईमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची शक्यता सात टक्क्यांनी कमी आहे. दिवसाचे तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या जवळपास असणार आहे. तर रात्री ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.

हेड टू हेड

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण ३० सामने खेळण्यात आले आहेत. त्यापैकी CSK ने 19 सामने जिंकले असून  कोलकाता संघ 10 च सामने जिंकू शकला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही. केकेआरविरुद्धच्या गेल्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये सीएसकेनेच दबदबा कायम राखत विजय मिळवले आहेत.

हेही वाचा : DC vs RCB : नाद करा! पण, ‘किंग’ कोहलीचा कुठं? रचला नवा विक्रम, असं करणारा ठरला एकमेव फलंदाज..

चेन्नई आणि कोलकाता संघातील संभाव्य ११ खेळाडू

चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य खेळी 11 : रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (क आणि यष्टिरक्षक), आर अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराना, खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य खेळत 11 : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन अली/स्पेंसर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवती

Web Title: Who will emerge victorious today csk will clash with kkr csk vs kkr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 02:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.