केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
DC vs RCB : आयपीएल २०२५ सध्या मध्यावर आली असून गुणतालिकेत चढ उतार दिसायला सुरवात झाली आहे. या हंगामातील २४ वा सामना काल म्हणजे १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबी संघाला आपल्या घरच्या मैदनावर आताच नाही तर बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे. या सामन्यात देखील बेंगळुरू संघ खूप संघर्ष करताना दिसून आला. सामन्याच्या चांगल्या सुरुवातीनंतर देखील आरसीबीला मोठ्या धावसंखेपर्यंत पोहचता आले नाही. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने दिल्लीसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रतिउत्तरात केएल राहुलच्या दमदार अर्धशतकाच्या जोरवार दिल्लीने हे लक्ष्य सहज पूर्ण केले. या दरम्यान केएल राहुलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ५३ चेंडूत नाबाद ९३ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावाली. विजय मिळवून दिल्यानंतर, तो म्हणाला, “हे माझे मैदान आहे आणि मला ते चांगले माहित आहे.”
केएल राहुलच्या या चमकदार खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. सामना संपल्यानंतर राहुलने प्रतिक्रिया दिली, म्हणाला की, ती एक अवघड खेळपट्टी होती पण २० षटके खेळण्यासाठी मी खेळपट्टीच्या मागे असल्याने मला ते समजण्यास मदत होत गेली. मला कोणते शॉट्स खेळायचे? हे चांगले माहित होते आणि मला चांगली सुरुवात देखील करायची होती.
हेही वाचा : DC vs RCB : नाद करा! पण, ‘किंग’ कोहलीचा कुठं? रचला नवा विक्रम, असं करणारा ठरला एकमेव फलंदाज..
राहुल तो पुढे म्हणाला की, अशा विकेटवर कसे खेळायचे? हे मला माहितच होते. जर तुम्हाला मोठा षटकार मारायचा असेल तर तो कुठे मारायचा? विकेटकीपिंगमुळे मला याबाबत कळले की फलंदाज कुठे बाद होत आहेत आणि कुठे षटकार मारत लगावत आहेत. मी झेल सोडला आणि तिथून पुन्हा एक सुरुवात केली, तेव्हा नशिबाची मला साथ लाभली.
राहुल पुढे म्हणाला की, हे माझे मैदान आहे, ‘हे माझे शहर आहे आणि मला त्याबद्दल इतरांपेक्षा जास्त माहिती आहे. मी वेगवेगळ्या प्रकारच्या विकेटशी नेहमी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मी ते अमलात आणतो. मी बऱ्याचदा बाद होतो पण यामुळे मला समजते की मला कुठे एक धाव मिळेल आणि कुठे सहा धावा मिळणार आहेत.
हेही वाचा : CSK vs KKR : CSK ला कर्णधार धोनी विजयी रुळावर आणणार? केकेआरविरुद्ध आज खरी कसोटी…
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुलने शानदार खेळी करत डिसीला विजय मिळवून दिला. राहुलने ५३ चेंडूचा सामना करत ९३ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ६ षटकार लगावले. केएल राहुलने सलग दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावले असून त्याने दिल्लीसाठी सलग दोन सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले आहे.