Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WI VS NZ : टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे जोडीचा WTC मध्ये धुमाकूळ! सलामीच्या ‘त्या’ पराक्रमाने रचला विश्वविक्रम 

न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या डावात पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ३२३ धावांची भागीदारी रचून विश्वविक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 18, 2025 | 03:13 PM
WI vs NZ: The pair of Tom Latham and Devon Conway wreaked havoc in the WTC! Their opening partnership created a world record with 'that' remarkable feat.

WI vs NZ: The pair of Tom Latham and Devon Conway wreaked havoc in the WTC! Their opening partnership created a world record with 'that' remarkable feat.

Follow Us
Close
Follow Us:

Tom Latham and Devon Conway World Record : न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धुमाकूळ घातला आहे. न्यूझीलंडच्या डावात पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ३२३ धावांची भागीदारी रचून विश्वविक्रम केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात किवी सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ३०० किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करण्याची ही दुसरीच वेळ ठरली आहे. याआधी १९७२ मध्ये टेरी जार्विस आणि ग्लेन टर्नर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध जॉर्जटाऊन कसोटी सामन्यात पहिल्या विकेटसाठी ३८७ धावांची भागीदारी रचण्याची किमया साधली होती.

 

हेही वाचा : IND vs SA 4th T20I : तिकीटासाठी पठ्ठ्याने गव्हाचे 3 पोते विकले! सामना रद्द अन् चाहत्याचा संताप अनावर; Video Viral

कसोटीत पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रम ग्रॅमी स्मिथ आणि नील मॅकेन्झी यांच्या नावावर जमा आहे.  २००८ मध्ये बांगलादेशविरुद्ध चितगाव कसोटी सामन्यात या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४१५ धावांची महाभागीदारी रचली होती.

कसोटींमधील सर्वोच्च सलामी भागीदारी

  1. पंकज रॉय-विनू मंकड : ४१३ धावा विरुद्ध न्यूझीलंड, १९५६ चेन्नई कसोटी
  2. वीरेंद्र सेहवाग-राहुल द्रविड: ४१० धावा विरुद्ध पाकिस्तान, २००६ लाहोर कसोटी
  3. टेरी जार्विस आणि ग्लेन टर्नर: ३८७ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, १९७२ जॉर्जटाऊन कसोटी
  4. बॉब सिम्पसन आणि बिल लॉरी: ३८२ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, १९६५ ब्रिजटाऊन कसोटी
  5. ग्रीम स्मिथ आणि हर्शेल गिब्स: ३६८ धावा विरुद्ध पाकिस्तान, २००३ केपटाऊन कसोटी

WTC मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी वर्ल्ड टेस्टच्या इतिहासात सर्वाधिक सलामी भागीदारीचा विश्वविक्रम रचण्याची किमया साधली आहे. यापूर्वी, हा विक्रम रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्या खात्यावर जमा होता. या दोघांनी २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची सलामी भागीदारी रचली होती. आता टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ३२३ धावांची भागीदारी रचत हा विक्रम मोडीत काढला आहे.

हेही वाचा : IPL 2026 Mini Auction : “बोली सुरू अन् अश्रू रोखू….” IPL लिलावात 14.20 कोटींची लाॅटरी लागलेला कार्तिक शर्मा झाला व्यक्त

न्यूझीलंडमधील सर्वोच्च सलामी भागीदारी

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी न्यूझीलंडमधील कसोटी सामन्यात सर्वाधिक सलामी भागीदारीचा नवा विक्रम रचला गेला. मागील विक्रम २७६ धावांचा रचण्यात आला होता, तो म्हणजे स्टीवी डेम्पस्टर आणि जॅकी मिल्स (१९३० मध्ये वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड) आणि शेर्विन कॅम्पबेल आणि एड्रियन ग्रिफिथ (१९९९ मध्ये हॅमिल्टनमध्ये वेलिंग्टन विरुद्ध न्यूझीलंड) यांच्या नावावर नोंदवण्यात आला होता.

कर्णधार टॉम लॅथमने आपले १५ वे कसोटी शतक पूर्ण केले आहे आणि कर्णधार म्हणून त्याचे पाचवे शतक ठरले आहे. त्याच्यासोबत डेव्हॉन कॉनवेने देखील शानदार शतक झळकवले. २४६ चेंडूत १३७ धावा काढून लॅथम माघारी गेला. त्याच्या डावात टॉम लॅथमने १५ चौकार आणि एक षटकार मारला, तर डेव्हॉन कॉनवे १७८ धावांवर नाबाद आहे.

Web Title: Wi vs nz the latham and conway pair set a world record for the highest opening partnership in the wtc with 323 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 03:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.