Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Boxing Cup Finals : वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये भारताचा ‘सोनेरी’ पंच! पाच महिला खेळाडूंनी घेतला गोल्ड मेडलचा वेध

वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. या स्पर्धेत मीनाक्षी हुडा, अरुंधती चौधरी, प्रीती पनवार आणि नुपूर शेओरन या चार भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांवर नाव कोरले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 20, 2025 | 08:07 PM
World Boxing Cup Finals: India's 'golden' four in the World Boxing Cup! Four women players aim for gold medal

World Boxing Cup Finals: India's 'golden' four in the World Boxing Cup! Four women players aim for gold medal

Follow Us
Close
Follow Us:
  • वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये भारताने चार गोल्ड मेडल जिंकले 
  • मीनाक्षी हुडाने महिलांच्या ४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले 
  • मीनाक्षी, प्रीती, अरुंधतीसह नुपूर शेओरन या चार खेळाडूंनी गोल्ड मेडल जिंकले 
India wins four gold medals at World Boxing Cup : वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये भारताने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.  भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांची हॅटट्रिक झाली आहे. मीनाक्षी हुडाने महिलांच्या ४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले. त्यानंतर प्रीती पवारने देखील ५४ किलो गट जिंकला आणि अरुंधती चौधरीने ७० किलो गट जिंकून गोल्ड मेडल जिंकले.

मीनाक्षी हुडाने गुरुवारी वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये पहिल्या सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने महिलांच्या ४८ किलो गटात  उझबेकिस्तानच्या फरझोना फोझिलोवाचा दमदार पराभव केला आणि इतिहास घडवला.

हेही वाचा : ‘मुलाला दुबईत सोडून, मी…’, शोएब मलिकपासून वेगळे झाल्याबद्दल सानिया मिर्झाने व्यक्त केली वेदना

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल २०२५ मध्ये मीनाक्षी हुडाने फोझिलोवाचा ५-० च्या फरकाने मोठा पराभव केला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर मीनाक्षी म्हणाली की,  “मी सुरुवातीला घाबरले होते, पण नंतर मी गर्दी पाहून उत्साह निर्माण झाला. देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मला आनंद झाला आहे.”

याशिवाय, प्रीती पनवारने २०२५ च्या विश्वचषकातील कांस्यपदक विजेत्या इटलीच्या सिरीन चाराबीला पराभूत हरवून सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ५४ किलो वजनी गटात प्रीतीने सिरीनवर जोरदार मुक्का मारले आणि पूर्ण नियंत्रणासह सुवर्णपदकावर नाव कोरले.

हेही वाचा : कोलकाता खेळपट्टी वाद! गौतम गंभीर आणि ईडन गार्डन्स क्युरेटर पुन्हा भिडले? वाचा सविस्तर

यानंतर, भारताच्या अरुंधती चौधरीने देखील आपला दम दाखवत उझबेकिस्तानच्या अझीजा झोकिरवाला धूळ चारत सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर नुपूर शेओरनने महिलांच्या ८०+ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या ओल्टिनॉय सोटिम्बोएवाला पराभूत  करत भारताच्या खात्यात चौथे सुवर्णपदक टाकले.

भारताची स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप २०२५ मध्ये सुवर्णपदक जिंकत भारताच्या खात्यात पाचवे सुवर्णपदक जमा केले.  गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात निखतचा सामना चिनी तैपेई बॉक्सर जुआन यी गुओशी झाला. ५१ किलो वजनी गटात निखतने उत्कृष्ट पंच आणि वेगाने तिच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आणि राष्ट्रीय ध्वज अभिमानाने फडकवला.

फुटबॉल विश्वचषकात कुराकाओ देशाने मिळवली पात्रता

अंदाजे १५०,००० लोकसंख्या असणाऱ्या कुराकाओ देशाने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात स्थान मिळवून इतिहास रचला आहे. जमैकाशी गोलरहित बरोबरी साधल्यानंतर कुराकाओने पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्रता मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. यामुळे विश्वचषकासाठी पात्र ठरणारा तो सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. यापूर्वी, आइसलँड हा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश होता. रशियामध्ये २०१८ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरला तेव्हा त्याची लोकसंख्या अंदाजे ३५०,०००होती.

Web Title: World boxing cup finals three women athletes including meenakshi hooda won gold medals in the world boxing cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 07:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.