गौतम गंभीर आणि ईडन गार्डन्स क्युरेटर (फोटो-सोशल मीडिया)
Kolkata pitch controversy : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून या मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकाता येथील इदं गार्डन्सवर खेळल गेला. या सामन्यात भारताच्या पराभवानंतर, पिचभोवती बराच वाद निर्माण झाला आहे. कसोटी सामना तीन दिवसांतच संपुष्टात आला ही कुणीदेखील मान्य करू शकत नाही. माजी भारतीय महान खेळाडू प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार टीका करण्यात येत आहे. पिचवरील वाद इतका वाढला की कोलकात्याचे पिच क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी त्यांचे मौन सोडले आहे. तसेच निवेदन द्यावे लागले. मुखर्जी यांनी “ही पिच अजिबात वाईट नाही.” असे म्हटले आहे.
हेही वाचा : IND vs SA 2nd Test :गुवाहाटी कसोटीत गिल न खेळल्यास पंतची लागेल लॉटरी! असेल खास इतिहास रचण्याची संधी…
पिचबद्दल देण्यात आलेल्या मुलाखतीत मुखर्जी म्हणाले की, “मला माहित आहे की प्रत्येकजण या पिचवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून खरे सांगायचे झाले तर, मला माहित आहे की कसोटी सामन्यासाठी पिच कशी तयार करण्यात येते. मी अगदी तेच केले आहे. मी सूचनांचे पालन केले. इतर काय म्हणतात याची मला काही एक पर्वा नाही. सर्वांनाच सर्वकाही माहित असते असे नाही. म्हणूनच मी माझे काम परिश्रमपूर्वक करतो आणि भविष्यात देखील तेच करू इच्छितो.”
दुसरीकडे, गौतम गंभीरनेही खेळपट्टीचे समर्थन करत म्हटले आहे की, आमच्याकडून अशा खेळपट्टीची विनंती करण्यात आली होती. पराभवाचे कारण खेळपट्टी नव्हती, तर फलंदाजांना कठीण परिस्थितीत धावा काढण्यात जमले नाही. आता, याबाबत आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये गौतम गंभीर आणि खेळपट्टी क्युरेटर एकत्र दिसून आले आहेत. भारताच्या सराव सत्रादरम्यान दोघे एकमेकांशी बोलत असल्याचे दिसत आहेत आणि गंभीरने यावेळी खेळपट्टी क्युरेटरला जादुई मिठी देखील दिली आहे, ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये, गंभीर मुखर्जींना मिठी मारताना आणि त्यांच्याशी विनोद करताना दिसत आहे.
हेही वाचा : ‘मुलाला दुबईत सोडून, मी…’, शोएब मलिकपासून वेगळे झाल्याबद्दल सानिया मिर्झाने व्यक्त केली वेदना
भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि खेळपट्टी क्युरेटरने एकमेकांना ज्या पद्धतीने मिठी मारली त्यावरून ही स्पष्ट होते की, खेळपट्टीच्या वादाचा भारतीय संघावर कोणताही परिणाम झालेला नाही.






