Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनावश्यक स्पॅम कॉलमुळे 2.75 लाख टेलिफोन कनेक्शन तोडले; ट्रायच्या कठोर नियमांचा परिणाम

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी स्पॅम कॉल्स आणि मॅसेजबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. जर कोणी खाजगी मोबाईल नंबरवरून टेलिमार्केटिंग कॉल करत तर त्या ऑपरेटरवर कठोर कारवाई करण्याचे आदेश TRAI ने दिले होते. या आदेशानुसार, आता कठोर पाऊल उचलत स्पॅम कॉलमुळे 2.75 लाख टेलिफोन कनेक्शन तोडण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2024 | 08:08 AM
अनावश्यक स्पॅम कॉलमुळे 2.75 लाख टेलिफोन कनेक्शन तोडले; ट्रायच्या कठोर नियमांचा परिणाम (फोटो सौजन्य - pinterest)

अनावश्यक स्पॅम कॉलमुळे 2.75 लाख टेलिफोन कनेक्शन तोडले; ट्रायच्या कठोर नियमांचा परिणाम (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने स्पॅम कॉल आणि मॅसेज करणाऱ्या कंपन्याविरोधात कठोर पाऊलं उचलली आहेत. कोणत्याही संस्थेने स्पॅम कॉल करण्यासाठी आपल्या SIP/PRI लाईन्सचा दुरुपयोग केला, तर त्याच्या दूरसंचार सेवा प्रदात्याद्वारे (TSP) कंपनीची सर्व दूरसंचार संसाधने डिस्कनेक्ट केली जातील आणि ती संस्था ब्लॅक लिस्टमध्ये टाकली जाईल, असा नियम काही दिवसांपूर्वीच TRAI ने जारी केला होता. आता TRAI च्या या नियमाचा चांगलाच परीणाम होताना पाहायला मिळतं आहे.

हेदेखील वाचा- TRAI ने करोडो मोबाईल वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा, आता ‘या’ दिवसापासून लागू होणार नवीन नियम

TRAI च्या या नव्या नियमंनुसार आतापर्यंत अनावश्यक कॉलमुळे 2.75 लाख टेलिफोन कनेक्शन तोडण्यात आले आहेत. शिवाय अशा कामांमध्ये सहभागी 50 युनिट्सचा समावेश ब्लॅक लिस्टमध्ये करण्यात आला आहे. TRAI ने 13 ऑगस्ट रोजी स्पॅम कॉल्सबाबत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. तसेच सर्व कंपन्यांना या नियमांचे पालन करण्यास सांगितलं होतं. ज्या कंपन्यांनी या नियमांचे पालन केलं नाही त्यांच्यावर आता कठोर कारवाई केली जात आहे. नव्या नियांनुसार टेलिकॉम कंपन्यांना अनावश्यक आणि स्पॅम कॉल्स करणाऱ्यांचे टेलिफोन कनेक्शन तोडण्यास आणि अनावश्यक स्पॅम कॉलमध्ये सामील असलेल्या युनिट्सना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यास सांगितलं आहे.

TRAI ने मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, अनावश्यक आणि स्पॅम कॉल्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहीत नोंदणी नसलेल्या टेलीमार्केटरच्या विरोधात 7.9 लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. सध्या करण्यात आलेल्या कारवाईबाबत TRAI ने सांगितलं आहे की, नुकत्याच उचलेल्या पावलांमुळे अनावश्यक आउटेज कमी होईल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. TRAI ने सर्व भागधारकांना स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम टेलिकॉम इकोसिस्टममध्ये योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. या संसाधनांचा गैरवापर करणाऱ्या अनोंदणीकृत टेलिमार्केटरना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील TRAI ने दिला आहे.

हेदेखील वाचा- TRAI च्या नावे केले जात आहेत फ्रॉड कॉल्स; टेलिकॉम अधिकाऱ्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

मागील आठवड्यात TRAI ने दूरसंचार उद्योगातील कंपन्यांसोबत बैठक घेतली. या वेळी TRAI ने कंपन्याना विचारलं होत की, अनावश्यक कॉलर्सवर कारवाई करण्यासाठी ठराविक नंबरवरील कॉल आणि एसएमएससाठी उच्च दर लागू करावा का? याशिवाय TRAI ने कंपन्यांना, दररोज 50 पेक्षा जास्त कॉल करणारे किंवा 50 एसएमएस पाठवणारे ग्राहक तपासण्यास सांगितले होते. यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

TRAI ने 8 ऑगस्ट रोजी दूरसंचार ऑपरेटर, टेलिमार्केटर आणि इतर भागधारकांसोबत एक बैठक घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी स्पॅम संदेश आणि कॉल्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. TRAI ने सांगितलं होतं की, जर एखाद्या संस्थेने स्पॅम कॉल करण्यासाठी आपल्या SIP/PRI लाईन्सचा दुरुपयोग केला, तर त्याच्या दूरसंचार सेवा प्रदात्याद्वारे (TSP) कंपनीची सर्व दूरसंचार संसाधने डिस्कनेक्ट केली जातील आणि ती संस्था ब्लॅक लिस्टमध्ये टाकली जाईल.

या नवीन नियमानुसार, जर कोणी खाजगी मोबाईल नंबरवरून टेलिमार्केटिंग कॉल करत असेल तर टेलिकॉम ऑपरेटर्सना त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्पॅम कॉलद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी TRAI ने हे नवीन नियम जारी केले आहेत. TRAI च्या या नव्या नियमांमुळे स्पॅम कॉल्स आणि मॅसेजना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. तसेच ग्राहकांची देखील स्पॅम कॉल्सपासून सुटका होणार आहे.

Web Title: 2 75 lakh telephone connections disconnected due to unnecessary spam calls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 08:08 AM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
1

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश
2

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट
3

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली
4

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.