TRAI ने करोडो मोबाईल वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा, आता 'या' दिवसापासून लागू होणार नवीन नियम (फोटो सौजन्य - pinterest)
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने करोडो मोबाईल युजर्सना मोठा दिलासा दिला आहे. 1 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून TRAI चे नवीन नियम लागू करण्यात येणार होते. मात्र आता TRAI ने या नियमांची अंमलबजाणी करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. नियम लागू करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे करोडो मोबाईल युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. या नियमांची डेडलाइन 1 महिन्याने म्हणजे 30 दिवसांनी वाढवली आहे. आता हे नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात येणार आहेत.
हेदेखील वाचा- TRAI च्या नावे केले जात आहेत फ्रॉड कॉल्स; टेलिकॉम अधिकाऱ्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
बनावट एसएमएस थांबवण्यासाठी TRAI ने नवीन नियमावली जाहीर केली होती. 1 सप्टेंबर 2024 पासून या नियमांची अंमलबजाणी केली जाणार होती. मात्र आता 1 महिन्यानंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी ह्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रवेश सेवा प्रदाते आणि इतर भागधारकांच्या मागणीनुसार TRAI ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच, TRAI ने 31 ऑगस्ट 2024 पर्यंत दूरसंचार सेवा प्रदाते आणि टेलीमार्केटर यांना बनावट एसएमएस आणि कॉल्स रोखण्यासाठी URL, APK आणि OTT लिंक असलेले संदेश व्हाइटलिस्ट करण्यासाठी मुदत दिली होती. पण ही मुदत वाढवण्याची मागणी आता केली जात आहे.
दूरसंचार विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे बनावट लिंकसह मेसेज आणि कॉल्सवर मोठ्या प्रमाणात आळा बसून नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाण देखील कमी होईल. हे निमय उद्या 1 सप्टेंबरपासून लागू होणार होते. मात्र अद्याप अनेक टेलीमार्केटर्सनी अद्याप त्यांचे संदेश टेम्पलेट्स व्हाइटलिस्ट केलेले नाहीत, ज्यामुळे नवीन नियम लागू झाल्यानंतर, वापरकर्त्यांना OTP संदेश प्राप्त करण्यात अडचण येऊ शकते आणि ऑनलाइन पेमेंट करण्यात देखील समस्या निर्माण होऊ शकतात. याच सगळ्या गोष्टींचा विचार करत आता TRAI ने या नियमांची अंमलबजाणी करण्याची तारीख पुढे ढकलली आहे.
हेदेखील वाचा- टेलिकॉम कंपन्यांचे पूर्वीचे रिचार्ज प्लॅन पुन्हा सुरु होणार? TRAI मे मांडला एक खास प्रस्ताव
आता हे नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू केले जाणार आहेत. TRAI च्या निर्यणयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
TRAI ने 8 ऑगस्ट रोजी दूरसंचार ऑपरेटर, टेलिमार्केटर आणि इतर भागधारकांसोबत एक बैठक घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी स्पॅम संदेश आणि कॉल्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
TRAI ने आपल्या निर्देशात म्हटले आहे की, जर एखाद्या संस्थेने स्पॅम कॉल करण्यासाठी आपल्या SIP/PRI लाईन्सचा दुरुपयोग केला, तर त्याच्या दूरसंचार सेवा प्रदात्याद्वारे (TSP) कंपनीची सर्व दूरसंचार संसाधने डिस्कनेक्ट केली जातील आणि ती संस्था ब्लॅक लिस्टमध्ये टाकली जाईल. या नवीन नियमानुसार, जर कोणी खाजगी मोबाईल नंबरवरून टेलिमार्केटिंग कॉल करत असेल तर टेलिकॉम ऑपरेटर्सना त्याच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. स्पॅम कॉलद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी TRAI ने हे नवीन नियम जारी केले आहेत.