महिना 30 दिवसांचा मग 28 दिवसांचा रिचार्ज कसा?
या महिन्याच्या सुरवातीलाच टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमतींमध्ये भारीभक्कम वाढ केली. कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. रिचार्ज वाढीनंतर अनेक युजर्स नाराज होते. अनेकांना हे नवीन प्लॅन्स आता परवडण्याजोगे वाटत नाहीयेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही जिओ युजर असाल आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. जिओ मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर, ते 300 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅन देखील ऑफर करत आहे आणि मुख्य म्हणजे यात तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह अनेक फीचर्सचा फायदा घेण्याची संधी मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला याच प्लॅन्सविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत.
सध्या जिओ आपल्या प्रीपेड युजर्सना 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचे 5 रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. या सर्व प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री-अनलिमिटेड कॉलिंग, डेली डेटा आणि एसएमएस सारखे फायदे मिळतात. आज आम्ही या पाच योजनांची सर्व माहिती देत आहोत. तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम प्लॅन निवडू शकता-
हेदेखील वाचा – तुमच्या एका चुकीमुळे फोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब! अशा प्रकारे घ्या योग्य काळजी