फोटो सौजन्य - pinterest
सध्या अनेकजण DSLR कॅमेऱ्यापेक्षा मोबाईल कॅमेऱ्याला जास्त महत्त्व देतात. कारण जवळपास सर्वच टेक कंपन्यानी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्याच्या क्वालिटीमध्ये प्रचंड वाढ केली आहे. DSLR कॅमेऱ्यासारखेच फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील काढू शकता. शिवाय मोबाईल कॅमेऱ्याचा दुसरा फायदा म्हणजे, तुम्ही कुठेही गेलात तरी तुमचा मोबाईल तुमच्या सोबत असतो. तुम्ही अगदी सहज तुमचा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढू शकता. पण आपण प्रत्येकवेळी बाहेर जाताना DSLR सोबत घेऊन जाऊ शकत नाही.
हेदेखील वाचा- Apple ने रोलआउट केलं सर्वात मोठं iOS अपडेट! Apple इंटेलिजेंससह अनेक फीचर्सचा समावेश
फोटो काढताना DSLR ची लेन्स सतत बदलावी लागते. DSLR मधून फोटो काढताना आपल्याला कॅमेऱ्याचा अँगल देखील तपासावा लागतो. या सर्व मेहनतीनंतर आपण DSLR मध्ये चांगला फोटो काढू शकतो. पण मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढताना आपल्याला कॅमेऱ्याची लेन्स बदलावी लागत नाही. त्यामुळे काही वेळातच आपण चांगला फोटो काढू शकतो. सर्व टेक कंपन्या मोबाइल कॅमेऱ्याची क्वालिटी वाढवण्यात गुंतल्या आहेत. मोबाईल कॅमेरे आल्यापासून फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी DSLR कॅमेऱ्यांच्या जागी मोबाईल कॅमेऱ्यांचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
हेदेखील वाचा- अनेक नवीन फीचर्ससह ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार आहे Google Pixel 9 सिरीज!
DSLR कॅमेऱ्यांपेक्षा मोबाईल स्वस्त असल्याने लोक मोबाईल कॅमेरे अधिक वापरत आहेत. याशिवाय आपण मोबाईल कॅमेरा सहज ऑपरेट करू शकतो. तुमच्यासाठी सर्वगणसंपन्न असणारा हा मोबाईल कॅमेरा तुमच्या एका चुकीमुळे खराब होऊ शकतो. तुमच्याकडून नकळत झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे फोनचा कॅमेरा खराब होऊ शकतो.आम्ही तुम्हाला अशा गोष्टींची माहिती देणार आहोत ज्यांची काळजी न घेतल्यास फोनचा कॅमेरा कायमचा खराब होऊ शकतो.
आपण बाहेर गेलो आपल्याला लोकेशन माहीत नसेल तर आपण लोकेशन शोधण्यासाठी जीपीएसचा वापर करतो. बाईक चालवताना जीपीएसचा वापर करता यावा यासाठी लोक बाईकवर फोन फिक्स करतात. पण यामुळे फोनचा कॅमेरा खराब होऊ शकतो. बाईक किंवा स्कूटर चालवताना खूप कंपन होते, ज्याचा कॅमेऱ्यावर परिणाम होतो. यामुळे तुमच्या फोनचा कॅमेरा खराब होऊ शकतो ज्यामुळे चांगले फोटो येत नाहीत. बाईक चालवताना लोकेशन शोधण्यासाठी फोन वापरत असाल तर अशावेळी फोनचा कॅमेरा संरक्षित करण्यासाठी विशेष माउंटिंग किट वापरा. माउंटिंग किटमुळे तुमच्या फोनचा कॅमेरा सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल.
याशिवाय काही लोक मोबाईलला चांगले आयपी रेटिंग देत असल्याने पाण्यात जातात. पण फोन पाण्यात नेल्याने त्याच्या कॅमेऱ्यावर परिणाम होतो. कॅमेऱ्याच्या लेन्सपर्यंत पाणी पोहोचले तर कॅमेरा कायमचा खराब होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो पाण्यात फोनचा वापर करणं टाळा. आपण कॉन्सर्ट किंवा लाइव्ह शोमध्ये जातो तेव्हा तिथे लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. पण लेझर लाइटमुळे कॅमेरा लेन्स खराब होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही कॉन्सर्ट किंवा लाइव्ह शोमध्ये जाता तेव्हा लेझर लाइटच्या वेळी फोटो क्लिक होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.
सूर्यग्रहणाच्या वेळी अनेक लोक फोन कॅमेऱ्याने फोटो क्लिक करतात, जे योग्य नाही. यामुळे लेन्सवर परिणाम होऊ शकतो, आणि फोनचा कॅमेरा खराब होऊ शकतो. कडक सूर्यप्रकाशातही फोन कॅमेरा वापरल्यामुळे फोनच्या कॅमेऱ्यावर परिणाम होतो. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी आणि कडक सूर्यप्रकाशात फोनचा वापर करणं टाळा.