TECH NEWS (फोटो सौजन्य: social media )
आधार कार्ड हा सर्वात महत्वाचा कागदपत्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक सरकारी आणि खाजगी कामात ओळख पटवण्याचा सर्वात महत्वाचा कागदपत्र बनला आहे. पण जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव चुकीचे लिहिले असेल तर आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. नावातील एक छोटीशी चूक सरकारी योजनांचा लाभ घेणे, बँक खाते उघडणे, पास्पोट मिळवणे, मुलांचे प्रवेश घेणे किंवा पॅन-आधार लिंक करणे यासारख्या कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तर अश्यापरिस्थित तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या बसल्या हे व्यवस्थित करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडलं असेल की हे आपण घर बसल्या बसल्या कसे करू शकतो? तर यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.
iPhone 17 सोडा! स्वस्त मिळतोय Samsung चा क्लासी 5G फ्लिप फोन, बाजारात वेगळीच खेळी
कसे करू शकतो उपडेट?
तुम्हाला या साठी एक स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनने आधारकार्डमध्ये चुकीचे लिहिलेले नाव सुधारू शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स करावे लागतील. चला जाणून घेऊया आपलं नाव सुधारण्याची सगळ्यात सोपी पद्धत.
कसे कराल उपडेट?
तुम्ही कितीवेळा करू शकता बदल?
नाव दुरुस्त करताना, फक्त योग्य आणि वैध कागदपत्रे अपलोड करा. UIDAI च्या नियमांनुसार, नाव आयुष्यात फक्त दोनदाच बदलता येते. नाव दुरुस्त करताना जर काही चूक झाली तर ते वारंवार बदलणे शक्य होणार नाही.
मोफत आधार अपडेटची अंतिम तारिक काय?
UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) नागरिकांना आपले आधार तपशील व दस्तऐवज अपडेट करण्याचे आवाहन करत आहे, विशेषतः जे आधार 10 वर्षांपूर्वी घेतले गेले आहेत आणि त्यात कधीच अपडेट झालेले नाहीत. Document Update (जसे की पत्ता, नाव, जन्मतारीख इ.) साठी 50 रुपये शुल्क लागायचं, जे फिजिकल आधार सेवा केंद्रांवर अजूनही लागू आहे.
परंतु जर तुम्ही फक्त “माय आधार पोर्टल” (https://myaadhaar.uidai.gov.in) वरून जर तुम्ही डॉक्युमेंट्स ऑनलाइन अपडेट केले, तरच ती सेवा मोफत आहे. ही मोफत सेवा जून १४, २०२६ पर्यंत लागू आहे. पूर्वी ही अंतिम मुदत १४ जून २०२३, मग २०२५ अशी होती, आता वाढवून २०२६ करण्यात आली आहे. मात्र, जर तुम्ही आधार सेवा केंद्रावर जाऊन अपडेट करत असाल, तर तिथं ₹५० शुल्क अजूनही लागेल.
Xiaomi चा सर्वात पॉवरफुल प्रोसेसरचा 5G फोन, 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह चाहत्यांसाठी धमाका!