फोटो सौजन्य - X
ऑनलाइन टॅक्सी कंपनी OLA ची AI कंपनी Krutrim ने OLA साठी “मेड फॉर इंडिया” आणि “प्राईज्ड फॉर इंडिया” नावाच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. या योजनांतर्गत OLA साठी नवीन रोडमॅप आणि प्रायझिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनेक API (Application Programming Interface) आणि SDK (Software Development Kit) देखील समाविष्ट आहेत. भारतात बनवण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाला चालना देणे आणि डिजिटल स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे, हे Krutrim च्या योजनेचं उद्दिष्ट आहे. कंपनीने भारतीय स्टार्टअप्स, विद्यार्थी आणि विकासकांसाठी नवीनतम API आणि SDK डिझाइन केले आहे.
हेदेखील वाचा – OLA आता लवकरच किराणा डिलिव्हरी करणार! OLA कॅब्ससाठी कंपनीचं Ola Maps सुध्दा लाँच
बंगळुरूमधील Google I/O Connect इव्हेंटमध्ये, Google ने भारतीय विकासक आणि स्टार्टअपसाठी 70 टक्क्यांपर्यंत त्यांचे Maps API शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर काही दिवसांतच, मेड फॉर इंडिया आणि प्राईज्ड फॉर इंडिया योजना सुरू करण्यात आल्या. या योजनेसाठी AI कंपनी Krutrim ने ONDC (Open Network for Digital Commerce) सोबत करार केला आहे. याबाबत OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती दिली आहे.
As promised, here’s our response to @googlemaps ‘belated’ price cuts. It’s time we build world class alternatives to big tech giants and empower Indian innovation! I’m very excited to announce a further reduced pricing structure and our future product roadmap for Ola Maps… pic.twitter.com/zzuC90Qy03
— Bhavish Aggarwal (@bhash) July 18, 2024
OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, या योजनेमुळे भारतीय नवनिर्मितीला मोठी चालना मिळेल. आता वेळ आली आहे की आम्ही मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांसाठी जागतिक दर्जाचे पर्याय तयार करू आणि भारतीय नवकल्पना सक्षम करू. Ola Maps आणि रोडमॅपसाठी कमी किंमतीची रचना जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे.
हेदेखील वाचा – टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सची आकडेवारी जाहीर! Vodafone Idea यूजर्समध्ये घट; Jio – Airtel चे युजर्स वाढले
Ola Maps मध्ये नवीन काय उपलब्ध असेल
काही दिवसांपूर्वीच OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर ओला मॅप्सबाबत घोषणा केली होती. OLA आता नेव्हिगेशनसाठी गुगल मॅपची मदत घेणार नाही. कंपनीने स्वत:च्या नकाशा प्लॅटफॉर्म Ola Maps वर शिफ्ट होण्याची घोषणा केली आहे. यामुळे मॅप सेवेच्या खर्चात दरवर्षी 100कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशा प्रकारचे एक निवदेन OLA चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर जारी केलं होतं. यानंतर आता OLA ची AI कंपनी Krutrim ने OLA साठी “मेड फॉर इंडिया” आणि “प्राईज्ड फॉर इंडिया” नावाच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. या योजनांतर्गत OLA साठी नवीन रोडमॅप आणि प्रायझिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. यामध्ये अनेक API (Application Programming Interface) आणि SDK (Software Development Kit) देखील समाविष्ट आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने कोणत्याही थर्ड पार्टीवर अवलंबून न राहण्यासाठी OLA ने त्यांचे स्व:ताचे मॅप्स लाँच केले आहेत.