फोटो सौजन्य - सोशल मिडीया
टेलिकॉम कंपन्या Vodafone Idea, Jio आणि Airtel यांच्या युजर्सची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार Vodafone Idea च्या युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, तर Jio आणि Airtel चे युजर्स वाढले आहेत. Jio ने मे महिन्यात 21.9 लाख मोबाइल ग्राहक जोडले आणि Airtel ने मे महिन्यात 12.5 लाख मोबाइल ग्राहक जोडले. Airtel च्या मोबाईल युजर्सची संख्या मे महिन्यात 34.4 लाखांनी वाढली आहे. तर जिओ वायरलेस ग्राहकांची संख्या मे महिन्यात ४७.४६ कोटी झाली आहे. Airtel च्या मोबाईल ग्राहकांची संख्या मे महिन्यात 12.50 लाखांनी वाढून 38.77 कोटी झाली आहे. मात्र Vodafone Idea च्या युजर्समध्ये घट झाली आहे. Vodafone Idea च्या मोबाईल ग्राहकांची संख्या 9.24 लाखांनी घटून 21.81 कोटी झाली आहे.
Vodafone Idea, Jio आणि Airtel याटिलेकॉम कंपन्यांनी एकाच वेळी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात वाढ केली आहे. Vodafone Idea, Jio आणि Airtel याटिलेकॉम कंपन्यांनी 3 जुलैपासून त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणा वाढ केली. तसेच पुढील आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये दूरसंचार कंपन्यांचा प्रति ग्राहक सरासरी महसूल (average revenue per user) 225 रुपयांपेक्षा जास्त होईल. ही सर्वोच्च पातळी असेल. अधिक नफा आणि कमी भांडवल खर्चामुळे दूरसंचार कंपन्यांच्या क्रेडिट प्रोफाइलमध्येही सुधारणा होईल, असे सांगितलं जात आहे. ARPU हा कोणत्याही दूरसंचार कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारा एक प्रमुख घटक आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2025-26 या आर्थिक वर्षात दूरसंचार कंपन्यांचे ARPU 25 टक्क्यांनी वाढेल. 2023-24 मधील 182 रुपयांच्या तुलनेत दूरसंचार उद्योगाचा ARPU पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस 225-230 रुपयांच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BSNL च्या युजर्समध्ये मार्च महिन्यांत मोठ्या संख्येने घट झाली होती. BSNL ने मोठ्या प्रमाणात त्यांचे ग्राहक गमावले होते. मात्र आता BSNL युजर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. Vodafone Idea, Jio आणि Airtel याटिलेकॉम कंपन्यांनी 3 जुलैपासून त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणा वाढ केली. त्यामुळे युजर्सनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. JIO, Airtel आणि VI या कंपन्याच्या रिचार्ज दर वाढीच्या निर्णयानंतर ग्राहकांची BSNL ला पसंती मिळाली. BSNL ने देखील ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्लॅन सुरु ठेवले. ज्यामुळे ग्राहक कमी पैशात उत्तम इंटरनेट डेटा वापरू शकतात. टॅरिफ प्लॅनच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांची BSNL ला पंसती मिळाली. आठवडाभरात BSNL च्या सिम विक्रीत 3 पटीने वाढ झाली. लाखो युजर्सनी त्यांचे सिम BSNL मध्ये पोर्ट केलं. त्यामुळे BSNL युजर्सची संख्या 20 कोटी झाली आहे.