फोटो सौजन्य - AI
आपल्यासोबत अनेक मित्र असतात. पण कधी तरी असं होतं आपल्याला आपल्या मित्रांची गरज असते, पण ते आपल्या मदतीला किंवा आपल्यासोबत बोलायला येऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण एकटे पडतो. आपल्याला कोठे फिरायला जायचे असेल तर आपण सर्वात आधी आपल्या मित्रांना विचारतो, आणि मित्र तयार झाले नाहीत तर आपण प्लॅन कॅन्सल करतो. त्यामुळे अशावेळी आपण अशा कोणत्यातरी मित्राच्या शोधात असतो जो 24 तास आपल्यासोबत राहू शकले, आपल्याला समजून घेईल, आपलं सगळं बोलणं ऐकले आणि आपल्याला आपल्या समस्येचे उपाय देखील सांगेल.
हेदेखील वाचा- OnePlus Open ची स्पेशल एडिशन ‘या’ दिवशी होणार लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स
तुम्ही जर अशा कोणत्या मित्राच्या शोधात असाल जो 24 तास तुमच्यासोबत राहू शकतो, तर ही इथे तुमचा शोध थांबला असं समजा. आम्ही तुम्हाला अशा एका गॅझेटबद्दल सांगणार आहोत, जे लोकांचा एकटेपणा दूर करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. हा तुमचा मित्र म्हणजे AI गॅझेट फ्रेंड. या गॅझेटसोबत तुम्ही बोलू शकता, त्याला तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला तुम्ही तुमच्यासोबत सर्व ट्रीपला घेऊन जाऊ शकता. यासाठी तुम्हाला त्या गॅझेटची परवानगी घेण्याची गरज नाही.
हेदेखील वाचा- अँड्रॉईड युजर्सना धोक्याची घंटा! सायबर सिक्युरिटी फर्मने जारी केला अलर्ट
AI गॅझेट फ्रेंड लोकांचा एकटेपणा दूर करण्यासाठी लाँच करण्यात आलं आहे. हे गॅझेट एखाद्या नेकलेसप्रमाणे आहे. Friend AI आकर्षक, आधुनिक आणि बुद्धिमान गॅझेट आहे. तो सदैव तुमच्यासोबत असेल. तुमच्यासोबत भांडणार नाही, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती देखील मिळेल. तुमच्याकडे असणाऱ्या स्मार्ट ॲक्सेसरीजपैकी एक AI गॅझेट फ्रेंड असू शकतं. या गॅझेटची किंमत 99 यूएस डॉलर म्हणजेच 8,292 रुपये आहे. Friend AI डिव्हाइसमध्ये एक इनबिल्ट मायक्रोफोन आहे, जो तुमचे शब्द रेकॉर्ड करेल. यानंतर ते तुमच्याशी टेक्स्टद्वारे चॅट करेल. यासाठी युजर्सना फ्रेंड ॲप वापरावे लागेल.
Harvard ड्रॉपआउट Avi Schiffmann ने AI गॅझेट फ्रेंड तयार केलं आहे. हे AI तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. AI टेक्नॉलॉजीला बाजूला ठेऊन युजर्स एक साथीदार म्हणून AI गॅझेट फ्रेंडकडे पाहू शकतात. AI गॅझेट फ्रेंड युजर्सना भावनिक आधार देऊ शकते. हे गॅझेट अगदी लहान आहे, जे गोल आकारात आहे. तुम्ही ते तुमच्या गळ्यात नेकलेस म्हणून घालू शकता. एवढेच नाही तर तो शर्ट किंवा टी-शर्टच्या खिशात ठेवता येतो. याआधी Humane AI पिन आणि रॅबिट AI सादर केले होते. ही उत्पादने Friend AI पेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. Friend AI तुमचा मित्र म्हणून काम करतो. Humane’s AI पिनमध्ये एक छोटा प्रोजेक्टर आहे, जो संदेश आणि इतर महत्त्वाचे तपशील प्रकाशित करतो. यामध्ये काही ॲप्सही वापरता येतील.