फोटो सौजन्य - pinterest
तुम्ही देखील अँड्रॉईड युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Clefi नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मने अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सना सुरक्षेबाबत इशारा जारी केला आहे. सध्या एक मालवेअर अँड्रॉइड युजर्सना लक्ष्य करत आहे. BingoMod असं या मालवेअरचं नाव आहे. हा मालवेअर एका अँटीव्हायरस ॲपच्या माध्यमातून पसरत आहे. हा मालवेअर एखाद्या ॲप सारखा आहे, त्यामुळे अँड्रॉईड युजर्सना कोणतेही ॲप डाऊनलोड करताना काळजी घेणं आवश्यक आहे. हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये आल्यास तुमच्या फोनमधील सर्व डेटा लीक केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत अँड्रॉईड युजर्सने काळजी घेणे गरजेचे आहे.
हेदेखील वाचा – UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार नाही कोणतेही पेमेंट; बँकेने दिला अलर्ट
Clefi सायबर सिक्युरिटी फर्मने दिलेल्या माहितीनुसार, हा BingoMod मालवेअर अँड्रॉईड युजर्सना लक्ष्य करत आहे. याद्वारे युजर्सची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो आणि नंतर त्याच्या मदतीने अँड्रॉईड युजर्सची फसवणूक केली जाते. BingoMod वास्तविक अँटीव्हायरस ॲपसारखे दिसते. त्यामुळे बहुतांश लोकांची फसवणूक होऊ शकते. या मालवेअरपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे हे खरोखरच वापरकर्त्यांसाठी मोठे आव्हान आहे.
हेदेखील वाचा – WhatsApp वर आंतरराष्ट्रीय नंबर वरून कॉल येत असेल तर सावध व्हा; नाहीतर ठरला सायबर फ्रॉडचे शिकार
या मालवेअरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॅसेज पाठवले जातात. या मॅसेजद्वारे अँड्रॉईड युजर्सना ॲप डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं जातं. हे ॲप डाऊनलोड करताच BingoMod मालवेअर तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतो. ॲप डाऊनलोड करण्यासाठी हॅकर्स युजर्सना आमिष दाखवतात. यामुळेच युजर्स हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात आणि ॲप डाऊनलोड करतात. कोणतेही ॲप इन्स्टॉल करताना तुम्हाला लोकेशन, कॉन्टॅक्ट आणि गॅलरीमध्ये प्रवेश द्यावा लागतो.
BingoMod मालवेअर असलेला ॲप डाऊनलोड केल्यानंतर तो देखील तुमच्या फोनमधील लोकेशन, कॉन्टॅक्ट आणि गॅलरीमध्ये प्रवेश मागतो. तुम्ही हा प्रवेश मंजूर करताच तुमच्या फोनमधील डेटा लीक होण्यास सुरुवात होते. एकदा प्रवेश मंजूर झाल्यानंतर, तुमची वैयक्तिक महिती हॅकर्स पर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत अँड्रॉईड युजर्सने स्वतःला सुरक्षित ठेवण एक मोठं आव्हान आहे. तुमची एक चूक आणि तुम्ही हॅकर्स च्या जाळ्यात अडकू शकता. त्यामुळे अशा परिस्थितीत युजर्सनी कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी काळजी घेणं गरजेचं आहे.