Airtel ने ग्राहकांना दिली एक खास भेट, लाँच केलं पहिले AI आधारित स्पॅम कॉल-मेसेज डिटेक्शन टूल
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Airtel ने युजर्ससाठी एक खास भेट आणली आहे. Airtel ने त्यांच्या ऊसर्साठी स्पॅम कॉल-मेसेज डिटेक्शन टूल लाँच केलं आहे. हे टूल AI आधारित आहे. स्पॅम कॉल आणि मॅसेजची समस्या दिवेंदिवस वाढत आहे. या वाढत्या समस्येमुळे ग्राहक प्रचंड हैराण झाले आहेत. ग्राहकांच्या या समसेवर उपाय म्हणून आता Airtel ने एक खास टूल लाँच केलं आहे.
स्पॅम कॉल आणि संदेशांपासून ग्राहकांचा त्रास कमी व्हावा आणि त्यांच संरक्षण व्हावं या हेतूने Airtel ने पहिले AI आधारित स्पॅम कॉल-मेसेज डिटेक्शन टूल डिझाईन केले आहे. Airtel ने याला स्पॅम डिटेक्शन सोल्यूशन म्हटलं आहे. जे वापरकर्त्यांना रिअलटाइम संरक्षणासह स्पॅम ॲक्टिव्हिटी पासून स्वयंचलित संरक्षण देते. स्पॅम कॉल्स आणि मॅसेजच्या समस्येमुळे ग्राहक प्रचंड हैराण झाले आहेत. स्पॅम कॉल्स आणि मॅसेजमुळे फसवणुकीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या सर्व गोष्टींना आळा बसण्यासाठी आता Airtel एक मोठं पाऊल उचललं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Airtel चे स्पॅम शोधण्याचे टूल सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. कंपनीच्या सर्व ग्राहकांच्या क्रमांकावर ते लवकरच सक्रिय केले जाईल. यासाठी ग्राहकांना वेगळी सेवा विनंती करावी लागणार नाही किंवा कोणतेही ॲप डाउनलोड करावे लागणार नाही. हे टूल कॉल वारंवारता, कालावधी आणि इतर नमुने आणि संभाव्य धोके ओळखण्यासाठी AI साधनांचा वापर करून स्पॅम क्रियाकलापांबद्दल युजर्सना सतर्क करते.
हेदेखील वाचा- Flipkart Big Billion Days Sale 2024: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये लॅपटॉपवर मिळणार भरगोस डिस्काऊंट
यासोबतच हे टूल युजर्सना स्पॅम कॉल्स आणि मेसेजसह फिशिंग हल्ल्यांपासूनही वाचवते. हे टूल मॅसेजमध्ये आढळलेली URL स्कॅन करते आणि वापरकर्त्यांना त्या लिंकवर क्लिक करण्यापासून चेतावणी देते. Airtel ने सांगितले की हे साधन वापरकर्त्यांना धोकादायक स्कॅमरच्या विरोधात सतर्क करते जे वारंवार IMEI (International Mobile Equipment Identity) बदलतात. कंपनी आपल्या ग्राहकांना त्याच्या प्रगत स्पॅम संरक्षणासह अधिक सुरक्षित आणि उत्तम मोबाइल अनुभव देऊ इच्छिते.
स्पॅम कॉल-मेसेज डिटेक्शन टूल दुहेरी स्तर संरक्षणासह डिझाइन केले आहे, जे स्तरांवर दोन कार्य करते. यापैकी एक नेटवर्क स्तरावर आधारित आहे आणि दुसरा आयटी प्रणालीवर आधारित आहे. Airtel नेटवर्कचे सर्व कॉल संदेश या टूलद्वारे पूर्ण केले जातात. कंपनीचे म्हणणे आहे की हे टूल 2 मिलीसेकंदमध्ये 1.5 अब्ज संदेश आणि 2.5 अब्ज कॉल्सवर प्रक्रिया करते आणि वापरकर्त्यांना स्पॅमपासून संरक्षण करते. Airtel चा दावा आहे की हे साधन दररोज 100 दशलक्ष स्पॅम कॉल आणि 3 दशलक्ष स्पॅम संदेश ओळखू शकते.