Amazon-Flipkart Festival Sale: फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स
अगदी दोन दिवसांतच Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सेलला सुरुवात होणार आहे. या सेलेमध्ये ग्राहकांना अनेक गोष्टींवर आकर्षक डिस्काऊंट दिलं जाणार आहे. वर्षातील सर्वात मोठी विक्री या आठवड्याच्या शुक्रवारपासून म्हणजेच 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. जर तुम्ही फ्लिपकार्ट प्लस सदस्य आणि Amazon प्राइम सदस्य असाल, तर तुमच्यासाठी हा सेल 26 सप्टेंबरपासूनच सुरु होणार आहे.
हेदेखील वाचा- फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजसाठी नथिंग आणि सीएमएफ डिव्हाइसवर 50% पेक्षा जास्त सूट! किमती केल्या जाहीर
Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सेलमध्ये तुम्हाला घरगुती वस्तूंपासून टेक गॅझेटपर्यंत अनेक वस्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे. तुम्हाला तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सेलमध्ये तुम्हाला iPhone वर चांगली डील मिळणार आहे. iPhone 15 सध्या याची किंमत 70 हजार रुपये आहे पण फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये ती 50 हजार रुपयांच्या खाली उपलब्ध असेल. तर iPhone 14 केवळ 40 हजार रुपयांना आणि iPhone 13 केवळ 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असेल. तुमच्यासाठी iPhone 14 आणि iPhone 13 ची खरेदी फायदेशीर ठरू शकते. कारण iPhone 15 मध्ये 60 Hz रिफ्रेश रेट आहे. तसेच यामध्ये Apple AI फीचर देखील मिळणार नाही. तुमचे बजेट जास्त असेल तर तुम्ही 15 प्रो आणि मॅक्स मॉडेल्सची खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सर्व फीचर्स मिळतील.
तुम्ही Google Pixel सिरीजची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Flipkart Big Billion Days पेक्षा उत्तम संधी शोधून सुध्दा सापडणार नाही. गेल्या वर्षीचा Pixel 8 स्मार्टफोन 31,999 रुपये आणि Pro सुमारे 60 हजार रुपयांना उपलब्ध होईल. तुम्ही स्टॉक अँड्रॉइड, वेळेवर सॉफ्टवेअर अपडेट्स, उत्तम कॅमेरा शोधत असाल, तर पिक्सेल डिव्हाइसपेक्षा चांगला पर्याय नाही. जर बजेट कमी असेल तर Pixel 7 हा देखील चांगला पर्याय असेल. ज्यांना बजेटची चिंता नाही, मग Google PIxel 9 Pro XL तुमची वाट पाहत आहे.
Samsung च्या पावरफुल स्मार्टफोनमध्ये Galaxy S23 Ultra चा समावेश केला जातो. 2023 साली लाँच केलेल्या S23 अल्ट्राचा दबदबा अजूनही कायम आहे. Samsung Galaxy S-23 Ultra केवळ एक स्मार्टफोन नसून परिपूर्ण पॅकेज आहे. स्क्रीन, अप्रतिम कॅमेरा, स्वच्छ यूजर इंटरफेस आणि एस पेन सपोर्ट, असे सर्वच फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. Play Store सोबत Galaxy Store चा देखील आनंद घेऊ शकता. Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सेलमध्ये तुम्ही केवळ 70,000 रुपयांच्या किंमतीत Samsung Galaxy S-23 Ultra ची खरेदी करू शकता.
हेदेखील वाचा- Tecno PoP 9 5G: 48MP Sony AI कॅमेरा असलेला Tecno फोन या दिवशी होणार लाँच
जर तुम्हाला बजेटमध्ये Google Pixel चा आनंद घ्यायचा असेल तर Nothing phone हा एकमेव पर्याय आहे. कंपनीने या वर्षी कोणतेही फ्लॅगशिप डिव्हाइस वाँच केले नसले तरी मिडरेंजमध्ये नथिंग फोन 2a लाँच करून त्याची भरपाई केली. पारदर्शक डिझाइन आणि बॅक पॅनल पूर्णपणे भिन्न दिसते. हा फोन मिडरेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला असला तरी, कंपनीने सेलच्या किंमती इतक्या कमी केल्या आहेत की तो बजेटमध्ये येईल. सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपये असेल.
Vivo X Fold 3 Pro ची क्रेझ देखील ग्राहकांमध्ये टीकून आहे. चार महिने खडबडीत आणि तुटपुंज्या वापरानंतरही असे वाटत नाही की दोन फोन बिजागराला अडकले आहेत. डिझाइन आणि वजनासाठी Vivo ला ग्राहकांची पसंती आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायची गरज नाही कारण कॅमेऱ्याच्या बाबतीत Vivo ने ग्राहकांची मन आधीच जिंकली आहेत. तुम्हाला फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास Vivo X Fold 3 Pro बेस्ट ऑप्शन आहे. हा फोन 1.60 लाख रुपयांना उपलब्ध आहे. परंतु सेलमध्ये तुम्ही 1.40 लाख रुपयांना त्याची खेरदी करू शकता.
बरं, बाजारात स्मार्टफोन आणि ऑफर्सची कमतरता नाही. तुम्ही चांगल्या ऑफर्स आणि डिस्काऊंटमध्ये तुमच्या आवडीचा स्मार्टफोन खरेदी करू शकता यात काही शंकाच नाही. पण विचार करून आणि गरजेनुसार खरेदी करावी लागेल. एक महत्वाची गोष्ट. फोन डिलिव्हर झाल्यावर तो ओपन करताना बॉक्सचा व्हिडिओ बनवा. फोनमध्ये काहीही डिफॉल्ट आढळल्यास हा व्हिडीओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.