चार्जिंग करताना Apple iPhone 14 Pro Max चा ब्लास्ट! कंपनीने चाचणीसाठी मागितला डिव्हाईस
चीनमध्ये Apple iPhone 14 Pro Max चा ब्लास्ट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोन चार्जिंगला लावलेला असताना ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, एका चिनी महिलेच्या iPhone 14 Pro Max ला रात्री चार्जिंग करताना आग लागली. शांक्सी रेडिओ आणि टेलिव्हिजन स्टेशनच्या रिपोर्टचा हवाला देत असे सांगण्यात येत आहे की, आयफोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यानंतर डिव्हाइसला आग लागली. ही घटना चीनच्या शांक्सी शहरात घडल्याचं सांगितलं जात आहे.
हेदेखील वाचा- पैसे खर्च न करता ठीक होणार आयफोनचा कॅमेरा, टेक जायंट Apple युजर्सना देतेय मोफत सेवा
ॲपलनेही या घटनेवर आपले निवेदन जारी केले असून घटनेची चौकशी करण्यासाठी महिलेकडे डिव्हाइस मागितले आहे. आयफोनमध्ये बसवण्यात आलेली बॅटरी मूळची होती की महिलेच्या डिव्हाइसवर थर्ड पार्टी बॅटरी बसवण्यात आली होती हे सध्या स्पष्ट झालेले नाही. यासोबतच ही महिला ॲपलचा मूळ चार्जर वापरत होती की बनावट हे देखील कळू शकलेले नाही. मात्र सहसा डिव्हाईसमधील बॅटरी थर्ड पार्टी असेल किंवा डिव्हाईस चार्ज करण्यासाठी कंपनीच्या मूळ चार्जरचा वापर केला जात नसेल, तर डिव्हाईसला आग लागल्याच्या घटना अगदी सहज घडतात. (फोटो सौजन्य – pinterest)
चीनमधील या महिलेने 2022 मध्ये iPhone 14 Pro Max खरेदी केला होता. घटनेच्या वेळी महिलेच्या iPhone 14 Pro Max डिव्हाईसची वॉरंटी संपली होती. मात्र तरी देखील आता कंपनीने हे डिव्हाईस चाचणीसाठी मागितलं आहे. कंपीनेव्दारे केल्या जाणाऱ्या चाचणीनंतर ब्लास्टचं नेमकं कारण समोर येणार आहे. यासोबतच कंपनीने यूजर्सना आयफोनमध्ये थर्ड पार्टी बॅटरी आणि चार्जर वापरण्याबाबत सावध केले आहे. असे केल्याने तुमच्या आयफोन डिव्हाईसचा ब्लास्ट होऊ शकतो, असं कंपनीने सांगितलं आहे.
iPhone 14 Pro Max apparently exploded while charging,
causing severe burns!#Apple pic.twitter.com/lQ8EG0vP2B— choqao (@choqao) November 4, 2024
हेदेखील वाचा- स्पॅम आणि फेक कॉल्सपासून आयफोन युजर्सची सुटका, ॲपलने घेतला महत्त्वाचा निर्णय
Apple कंपनी आयफोन डिव्हाईसच्या ब्लास्टच्या घटनेची चौकशी करत आहे. कंपनीने डिव्हाइसची वॉरंटी विचारात न घेता, संबंधित डिव्हाईस चाचणीसाठी कंपनीमध्ये परत करण्यास सांगितले आहे. यासोबतच कंपनीने आपल्या यूजर्सना सुरक्षेशी संबंधित उपायांकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. यासोबतच आयफोनमध्ये लावलेली बॅटरी खरी होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत चौकशी सुरु आहे.
आयफोनला चार्जिंग करताना कंपनीने युजर्सला काही गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जसं की, कंपनीने युजर्सना सुरक्षेची खबरदारी म्हणून बेड किंवा उशीजवळ फोन चार्ज न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे आगीचा धोका कमी होऊ शकतो. यासोबतच कंपनीचे म्हणणे आहे की फोन एकदा चार्ज झाल्यावर चार्जर बंद करणे आणि अनप्लग करणे देखील आवश्यक आहे. यासोबतच कंपनीने थर्ड पार्टी चार्जर वापरण्यासही मनाई केली आहे. थर्ड पार्टी चार्जरने फोन चार्ज केल्यास ब्लास्ट होण्याची शक्यता अधिक असते.
आयफोनच्या स्फोटाची ही घटना रात्रभर इलेक्ट्रॉनिक डिवाइस चार्ज करण्याच्या संभाव्य धोक्यांबद्दल देखील युजर्सना जागृत करते. यासाठी तज्ज्ञांनी रात्रभर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस चार्ज न करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच तुमच्या डिव्हाईससाठी थर्ड पार्टी पार्ट्स आणि चार्जर देखील वापरू नयेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डिव्हाइसमध्ये बिघाडाची चिन्हे दिसल्यास, त्वरित अधिकृत सेवा केंद्राकडे जावे आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसची चाचणी करून घ्यावी.