पैसे खर्च न करता ठीक होणार आयफोनचा कॅमेरा, टेक जायंट Apple युजर्सना देतेय मोफत सेवा
टेक जायंट कंपनी Apple ने एक सर्विस प्रोग्राम जाहीर केला आहे. या सर्व्हिस प्रोग्राममध्ये iPhone 14 Plus युनिटचा कॅमेरा मोफत दुरुस्त केला जाणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या आयफोन यूजर्सना त्यांच्या रियर कॅमेऱ्याबाबत समस्या येत आहेत, असे युजर्स अधिकृत ऍपल स्टोअरमध्ये त्यांच्या आयफोनचा कॅमेरा विनामूल्य दुरुस्त करण्यास सक्षम असतील. यासाठी Apple ने एलिजिबिलिटी क्राइटेरिया देखील ठेवला आहे. शिवाय कॅमेरा तपासण्याची पद्धतही स्पष्ट केली आहे.
हेदेखील वाचा- Birth Certificate चे अनेक फायदे, बनवण्याची प्रोसेस देखील अगदी सोपी! खर्च फक्त 20 रुपये
Apple ने आयफोन युजर्सना त्यांच्या मागील कॅमेऱ्यासह भेडसावणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीने iPhone 14 Plus युजर्ससाठी सर्व्हिस प्रोग्राम आणला आहे. ज्या अंतर्गत कॅमेरा विनामूल्य दुरुस्त केला जाईल आणि ज्या युजर्सनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी आधीच पैसे दिले आहेत त्यांना रिफंड मिळणार आहे. Apple च्या या निर्णयामुळे अनेक आयफोन युजर्सना दिलासा मिळाला आहे. मागील कॅमेराची ही समस्या iPhone 14 Plus च्या काही मॉडेल्समध्ये दिसून आली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
ज्या iPhone 14 Plus युनिटचे प्रोडक्शन एप्रिल 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान करण्यात आले होते, त्यांनाच या सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे की प्रभावित डिव्हाईस अधिकृत ऍपल सर्विस प्रोवाइडरकडून कोणत्याही किंमतीशिवाय या समस्येचे निराकरण करण्यात सक्षम होतील. Apple ने या समस्येचा शोध घेण्यासाठी एक पद्धत देखील दिली आहे.
हेदेखील वाचा- पाण्यामध्ये फोटो काढण्याची इच्छा आता पूर्ण होणार, Realme घेऊन येतोय अंडरवॉटर फोटोग्राफी मोड स्मार्टफोन
ग्राहक त्यांच्या हँडसेटवर परिणाम झाला आहे की नाही याची पडताळणी कंपनीला त्यांचा सीरियल नंबर देऊन करू शकतात. ज्या युजर्सनी आयफोन 14 प्लस वरील मागील कॅमेरा दुरुस्तीसाठी आधीच पैसे दिले आहेत ते देखील रिफड साठी Apple शी संपर्क साधू शकतात.
कंपनीच्या सपोर्ट पेजवर दिलेल्या माहितीनुसार, iPhone 14 Plus युनिट्सच्या ‘अत्यंत कमी टक्केवारी’ला मागील कॅमेरामध्ये समस्या येत आहेत. Apple च्या मते, 10 एप्रिल 2023 ते 28 एप्रिल 2024 दरम्यान निर्मित आयफोन 14 प्लस युनिट्स प्रभावित होऊ शकतात. आयफोन 14 प्लस युजर्स कंपनीच्या सपोर्ट पेजवर त्यांचा सीरियल नंबर प्रविष्ट करून त्यांच्या आयफोनला या समस्येचा सामना करावा लागत आहे की नाही हे शोधू शकतात.
त्यात काही अडचण आल्यास ॲपलच्या या कार्यक्रमांतर्गत मोफत दुरुस्ती करता येईल. Apple ने सांगितलं आहे की सर्व्हिस प्रोग्राम प्रभावित युनिट्स प्रथम खरेदी केल्यापासून तीन वर्षांपर्यंत कव्हर करेल.
iPhone 14 Plus वर सीरियल नंबर शोधण्यासाठी, युजर्स सेटिंग्ज ॲप उघडू शकतात आणि जनरल > About वर टॅप करू शकतात. या स्क्रीनवरील सीरियल नंबरवर जास्त वेळ दाबून ठेवल्याने एक कॉपी शॉर्टकट येईल, ज्यामुळे युजर्सना iPhone 14 Plus सर्विसे प्रोग्रामसाठी Apple च्या सपोर्ट पेजवर फील्डमध्ये मजकूर पेस्ट करता येईल.
Apple च्या सपोर्ट डॉक्युमेंटमध्ये असे म्हटले आहे की असे काही ग्राहक आहेत ज्यांना iPhone 14 Plus मध्ये समस्या येत आहेत. जसे की तुटलेली मागील काचेचे पॅनेल किंवा कॅमेराशी संबंधित इतर कोणतीही समस्या, यांचे या सर्व्हिस प्रोग्राममध्ये निराकरण केलं जाईल. मोफत सर्व्हिस प्रोग्रामव्यतिरिक्त, ॲपलने असेही म्हटले आहे की वापरकर्त्यांना इतर कोणतीही दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. केवळ कॅमेऱ्याची समस्या विनामूल्य निश्चित केली जात आहे.