फोटो सौजन्य -iStock
हल्लीच्या डिजीटल युगात आपली अनेक कामं अगदी सहज शक्य होतात. ऑनलाईन पेमेंट, व्हिडीओ कॉलींग, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन फूड ऑर्डर करणं, तिकीट बुक करणं, अशी अनेक कामं आपण अगदी सहज मोबाईलच्या मदतीने करू शकतो. पण ऑनलाईन पेमेंट आणि ऑनलाईन शॉपिंग करताना सायबर फ्रॉड करणाऱ्या लोकांमुळे आपली फसवणूक होऊ शकते. सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
हेदेखील वाचा – ही कंपनी देतेय मोफत वायफाय इंटरनेट! काय आहे प्रोसेस जाणून घ्या
आपण या ऑनलाईन स्कॅमपासून सुरक्षित राहावं असं प्रत्येकाला वाटतं, पण यासाठी नेमकं काय करावं हेच लोकांना माहिती नसतं. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या ऑनलाईन सायबर फसवूणकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार आणि अनेक कंपन्या मोठी पावले उचलतं आहेत. अशातच आता Apple ने देखील त्यांच्या युजर्ससाठी ऑनलाईन स्कॅमचा धोका टाळण्यासाठी काही टीप्स जारी केल्या आहेत. Apple ने आयफोन आणि मॅकसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जेणेकरून Apple युजर्स ऑनलाइन स्कॅमना बळी पडू नयेत. अनेकदा ऑनलाइन स्कॅमर iPhone आणि Mac युजर्सचा डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. यानंतर हा डेटा डार्क वेबवर टाकला जातो. जर एखाद्या युजर ऑनलाइन स्कॅमरच्या जाळ्यात अडकला, तर त्याची वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स आणि इतर अनेक महत्त्वाची माहितीही ऑनलाइन स्कॅमरपर्यंत पोहोचते. काही स्कॅमर लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लुबाडतात.
हेदेखील वाचा – ही कंपनी देतेय मोफत वायफाय इंटरनेट! काय आहे प्रोसेस जाणून घ्या
ऑनलाईन स्कॅमच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि Apple युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी आता Apple ने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. iPhone आणि Mac वर कोणतेही अज्ञात कॅलेंडर इव्हेंट स्वीकारू नका. Apple च्या मते, कोणत्याही iPhone आणि Mac युजर्सने त्यांची वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नये. तुमचा आयफोन सुरक्षित ठेवण्यासाठी Apple फेस आयडीचा वापर करा. तुमचे डिव्हाइस संरक्षित करण्यासाठी टू फॅक्टर वेरिफिकेशन चालू करा.