ॲपल ट्री-फोल्ड iPhone लाँच करण्याच्या तयारीत! दाखल केला नवीन पेटंट
अमेरिकन डिवाइसेज मेकर ॲपल फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनीने काही पेटंट अर्ज दाखल केले आहेत. मात्र, या स्मार्टफोनच्या लाँच तारखेबद्दल माहिती मिळालेली नाही. अलीकडे ॲपलने जुने पेटंट अपडेट केले आहेत. हे पेटंट ट्राय-फोल्ड स्मार्टफोनसाठी असू शकते. सध्या ट्राय स्मार्टफोन्सची क्रेझ फार वाढत आहे त्यातच आता ॲपलदेखील आपले नाव या स्मार्टफोन्सच्या यादीत नोंदवणार याची अशा आहे.
यूएस पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) कडे दाखल केलेल्या पेटंटचे शीर्षक ‘इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस विथ डिस्प्ले आणि टच सेन्सर स्ट्रक्चर्स’ असे आहे. यापूर्वी, डिस्प्लेच्या आत टच सेन्सर संरचना दर्शविल्या जात होत्या, परंतु ॲपलने त्यात बरेच बदल करून या पेटंटची व्याप्ती वाढवली आहे. ॲपलने या पेटंटकडे लक्ष दिले आहे. यामध्ये, एक्सटेर्नल डिस्प्लेला मोठ्या अंतर्गत डिस्प्ले पॅनलसह एकत्र केले गेले आहे. या पेटंटमध्ये बाहेरील डिस्प्लेसोबत आणखी एक डिस्प्ले पॅनल देखील आहे. या स्मार्टफोनची नवीन रचना ट्रिपल फोल्ड डिझाइन दर्शवते.
हेदेखील वाचा – Huawei Mate XT: जगातील पहिला ट्राय-फोल्डिंग स्मार्टफोन, भारतात किती किंमत? जाणून घ्या
हे चीनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी Huawei च्या नुकत्याच लाँच केलेल्या ट्रिपल फोल्ड स्मार्टफोन Mate XT सारखे आहे, ज्यामध्ये फोल्ड केल्यावर मध्यवर्ती स्तर लपविला जातो. त्याचा एक्सटेर्नल डिस्प्ले फोल्ड आणि अनफोल्ड अशा दोन्ही स्थितींमध्ये दिसतो. ॲपलच्या या पेटंट ऍप्लिकेशनमध्ये असे म्हटले आहे की, तंत्रज्ञान प्रत्येक डिस्प्ले भिंतीवर टच सेन्सर संरचना जोडेल आणि प्रत्येक डिस्प्ले स्वतंत्रपणे टच इनपुट गोळा करेल आणि प्रक्रिया करेल. गेल्या महिन्यात, एका अहवालात असे सुचवण्यात आले होते की ऍपलच्या आयफोन 18 मालिकेसह क्लॅमशेल-शैलीचा फोल्डेबल स्मार्टफोन आणला जाऊ शकतो. हे iPad आणि MacBook चे संकरित मॉडेल असू शकते. उघडल्यावर, 18.8-इंच स्क्रीन आढळू शकते.
Huawei Tri Fold:
हेदेखील वाचा – BSNL नंबरवर 4G ऍक्टिव्ह आहे की नाही? या ट्रिकच्या मदतीने क्षणार्धात शोधून काढा
Huawei ने मागेच आपला ट्री फोल्ड लाँच केला. हा स्मार्टफोन जगातील पहिला स्मार्टफोन आहे. Huawei च्या Mate XT ची स्क्रीन उघडल्यावर 10.2 इंच (3,184 x 2,232 पिक्सेल) आहे. या स्मार्टफोनची लवचिक LTPO OLED स्क्रीन एकदा फोल्ड केल्यावर 7.9 इंच (2,048 x 2,232 पिक्सेल) आणि दुसऱ्यांदा फोल्ड केल्यावर 6.4 इंच (1,008 x 2,232 पिक्सेल) आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि f/1.2 आणि f/4.0 मधील छिद्र असलेला 50-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये f/2.2 अपर्चरसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 5.5x ऑप्टिकल झूम आणि f/3.4 अपर्चरसह 12-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे.