Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple च्या स्मार्टवॉचना मिळालं नवीन अपडेट्स, आरोग्य आणि फिटनेससह अनेक फीचर्सचा समावेश

Apple त्यांच्या स्मार्टवॉच युजर्ससाठी एक नवीन अपडेट जारी केलं आहे. स्मार्टवॉच युजर्सना गेल्या काही दिवसांपासून ऑटोमॅटिक वॉच रीस्टार्ट, म्युझिक ॲप क्रॅश, बॅटरी ड्रेन आणि टच स्क्रीन रिस्पॉन्स न देणे यासांरख्या समस्यांचा सामना करावा लागत होता. आता अखेर कंपनीने ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन अपडेट आणलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2024 | 09:31 AM
Apple च्या स्मार्टवॉचना मिळालं नवीन अपडेट्स, आरोग्य आणि फिटनेससह अनेक फीचर्सचा समावेश

Apple च्या स्मार्टवॉचना मिळालं नवीन अपडेट्स, आरोग्य आणि फिटनेससह अनेक फीचर्सचा समावेश

Follow Us
Follow Us:

Apple ने watchOS 11.0.1 अपडेट आणण्यास सुरुवात केली आहे. हे अपडेट अशा यूजर्ससाठी आणले आहे ज्यांना गेल्या महिन्यात watchOS 11 रिलीज झाल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. अपडेटमध्ये अनेक गोष्टी सुधारल्या गेल्या आहेत. हे नवीन अपडेट युजर्ससाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य आणि फीटनेससह अनेक नवीन फीचर्स युजर्सना मिळणार आहेत.

हेदेखील वाचा- सायबर फसवणुकीसाठी नागरिकांना परदेशातून येतात कॉल, सुरक्षिततेसाठी लक्षात ठेवा महत्त्वाच्या टिप्स

या स्मार्टवॉचला मिळाले नवीन अपडेट

Apple Watch Series 6 आणि नवीन मॉडेल्ससाठी हे अपडेट आहे. या नवीन अपडेटमुळे युजर्सचा अनुभव आणि परफॉर्मेंस सुधारण्यात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. अपडेटमध्ये घड्याळ ऑटोमॅटिक रीस्टार्ट होण्याची समस्या सोडवली गेली आहे. म्यूजिक ॲप क्रॅश, जलद बॅटरी संपुष्टात येणे आणि नवीन मॉडेल्सवर टच स्क्रीन प्रतिसाद न देणे यासारख्या अनेक समस्यांचे निराकरण करून युजर्ससाठी नवीन अपडेट सादर करण्यात आलं आहे. Apple Watch Series 9, Series 10 आणि Ultra 2 च्या युजर्ससाठी हे अपडेट खूप महत्वाचे आहे. विशेषत: त्या यूजर्सना अपडेटनंतर मोठा दिलासा मिळणार आहे, ज्यांना टच स्क्रीन प्रतिसादात समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. (फोटो सौजन्य – pinterest)

अशा प्रकारे इन्स्टॉल करा नवीन अपडेट

  • अपडेट इन्स्टॉल करण्यासाठी, युजर्सना घड्याळाशी कनेक्ट केलेल्या iPhone वर Apple Watch ॲपवर नेव्हिगेट करणे आवश्यक आहे.
  • यानंतर, माय वॉच टॅब निवडा, त्यानंतर जनरल आणि नंतर सॉफ्टवेअर अपडेटवर जा.
  • तुमच्या स्मार्टवॉचमध्ये नवीन अपडेट इन्स्टॉल करण्यासाठी घड्याळ कमीतकमी 50% चार्ज केलेलं असणं महत्वाचे आहे.
हे अपडेट वॉचओएस 11 च्या रिलीझवर आले आहे, ज्याने ट्रेंनिंग लोड ट्रॅकिंग, नवीन व्हायटल्स ॲप आणि वर्कआउट्ससाठी चांगले रेस्ट डे इंटीग्रेशन यासारखी नवीन आरोग्य आणि फिटनेस वैशिष्ट्ये सादर केली आहेत. Apple स्मार्टवॉचमधील नवीन अपडेटमुळे घड्याळ आपोआप रीस्टार्ट होणे, म्युझिक ॲप क्रॅश होणे, बॅटरी लवकर संपणे आणि टच स्क्रीन प्रतिसाद न देणे, अशा समस्या आता सोडवण्यात आल्या आहेत. Apple Watch Series 9, Series 10, आणि Ultra 2 वापरकर्त्यांना फायदा होईल ज्यांना टच स्क्रीन प्रतिसादात अडचण येत होती.

हेदेखील वाचा- Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 वर मिळत आहे जबरदस्त ऑफर्स, बचत करण्याची संधी गमावू नका

नवीन आरोग्य आणि फिटनेस वैशिष्ट्ये

watchOS 11 सह, Apple ने अनेक नवीन आरोग्य आणि फिटनेस फीचर्स देखील लाँच केली आहेत. हे फीचर्स वापरकर्त्यांना त्यांच्या फिटनेस प्रवासात मदत करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. Apple चे हे नवीन अपडेट केवळ तांत्रिक समस्या सोडवत नाही, तर नवीन फीचर्ससह वापरकर्त्यांचे आरोग्य आणि फिटनेस अनुभव देखील सुधारते. वापरकर्त्यांना हे अपडेट शक्य तितक्या लवकर इन्स्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून ते या सर्व नवीन सुधारणा आणि वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकतील.

Web Title: Apple smartwatches get new update with features including heath and fitness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 09:31 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.