YouTube ची मोठी घोषणा! आता नाही चालणार क्लिकबेट, असे टायटल आणि थंबनेल असलेले Videos त्वरित हटवले जातील
YouTube दिशाभूल करणाऱ्या कंटेंटविरुद्ध आता आपला लढा वाढवत आहे. विशेषतः भारतात. प्लॅटफॉर्मने अलीकडेच घोषणा केली आहे की, ते दिशाभूल करणारे टायटल आणि थंबनेल असलेल्या व्हिडिओंवर आता लवकरच कारवाई सुरु करणार आहेत, ज्यांना अनेकदा ‘भयंकर क्लिकबेट’ मानले जाते. दर्शकांना प्लॅटफॉर्मला भेट देताना त्यांना विश्वासार्ह अनुभव मिळावा यासाठी YouTube च्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. विशेषतः बातम्या आणि चालू घडामोडींसाठी. क्रिएटर्ससाठी याचा काय अर्थ आहे? वास्तविक, कंपनी अशा व्हिडिओंबाबत आता सक्ती वाढवणार आहे ज्याच्या टायटल आणि थंबनेलमध्ये असे वचन दिले असेल जे मूळ व्हिडिओत अजिबात नाही.
उदाहरणावरून समजून घ्या
उदाहरणार्थ, ‘राष्ट्रपतींनी राजीनामा दिला आहे!’ शीर्षक असलेला व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. तथापि, जर व्हिडिओमध्येच अशा राजीनाम्याची चर्चा झाली नसेल तर ते ‘भयंकर क्लिकबेट’ श्रेणीत येईल. त्याचप्रमाणे, ‘टॉप पॉलिटिकल न्यूज’ असा दावा करणारी पण कोणतीही खरी बातमी न दाखवणारी थंबनेल देखील ध्वजांकित केली जाईल.
क्लिकबेट टाईटल आणि थांबनेल YouTube दर्शकांसाठी बऱ्यच काळापासून निराशाजनक आहेत. व्हिडिओवर क्लिक करून ते लोकांची दिशाभूल करतात. आणि क्लिक केल्यावर, कंटेंट काहीतरी वेगळी आहे. यामुळे वेळ तर वाया जातोच पण प्लॅटफॉर्मवरील विश्वासही कमी होतो. यूट्यूब म्हणते की ही समस्या जेव्हा ब्रेकिंग न्यूज किंवा चालू घडामोडींचा समावेश असेल तेव्हा आणखी गंभीर होते. कारण, गंभीर क्षणांमध्ये वेळेवर आणि अचूक माहिती मिळविण्यासाठी लोक अनेकदा प्लॅटफॉर्मवर अवलंबून असतात.
Airtel युजर्स लक्ष द्या! आता फ्रीमध्ये मिळेल ZEE5 चा एक्सेस, हजारो चित्रपटांचाही घेता येईल आनंद
येत्या काही महिन्यांपासून सक्ती सुरू होईल
या समस्येचा सामना करण्यासाठी, YouTube येत्या काही महिन्यांत भारतात कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात करेल. नवीन नियम हळूहळू जारी केले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. जेणेकरून क्रिएटर्सना नवीन नियमांशी जुळवून घेण्यास वेळ मिळेल. सुरुवातीला, YouTube निर्मात्यांच्या चॅनेलवर स्ट्राइक जारी न करता नवीन धोरणाचे उल्लंघन करणारे व्हिडिओ काढून टाकण्यावर लक्ष केंद्रित करेल. याचे लक्ष्य, क्रिएटर्सना शिक्षित करणे आणि त्यांच्या कंटेंटला ए़डजस्ट करण्यात मदत करणे हे आहे.
भारतात हा सक्ती आणण्याचे एक कारण म्हणजे भारतीय क्रिएटर्स बातम्या आणि वर्तमान घटनांशी संबंधित मोठ्या प्रमाणात कंटेंट अपलोड करतात. YouTube चा युजर आधार भारतात वाढत असल्याने, प्लॅटफॉर्म हे सुनिश्चित करू इच्छित आहे की सनसनाटी किंवा चुकीच्या टायटल्स आणि थंबनेल्समुळे दर्शकांची दिशाभूल होणार नाही.
Year Ender 2024: लिमिट वाढण्यापासून ते नवीन फीचर्सपर्यंत, यावर्षी किती बदलला UPI?
नवीन धोरणानुसार, अलीकडे अपलोड केलेल्या व्हिडिओंना प्राधान्य दिले जाईल. याचा अर्थ नियमांचे उल्लंघन करणारे जुने व्हिडिओ सध्या विचारात घेतले जाणार नाहीत. तथापि, क्रिएटर्सना त्यांच्या कंटेंटचे समीक्षण करणे आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण ऍडजस्टमेंट करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.