भारतातील आघाडीच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांप[पैकी एक ऐअरटेलने ZEE5 OTT प्लॅटफॉर्मसह पार्टनरशिपची घोषणा केली. आता एअरटेल वाय-फाय (Wi-Fi) ग्राहकांना रोमांचक डिजिटल कंटेंट उपलब्ध होणार. ZEE5 ग्राहकांना त्यांच्या एअरटेल WiFi प्लॅन्सचा भाग म्हणून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय रु. 699 आणि त्यावरील प्लॅनवर उपलब्ध असेल.
या भागीदारीमुळे, ZEE5 चा एक्सक्लूसिव कंटेंट ज्यात ओरिजिनल शो, OTT फिल्म आणि विविध भाषांमधील सिरींजसह खास कंटेंट आता प्रेक्षकांसाठी एअरटेल WiFi वर उपलब्ध असेल. हे ग्राहकांना डिजिटल कंटेंटचा एक मोठा कॅटलॉग प्रदान करेल. सॅम बहादूर, आरआरआर, जस्ट एक बंदा काफी है, मनोरथंगल, विकटकवी, द क्रॉनिकल्स ऑफ अमरगिरी, अंधम वेधम, गयाह ग्यारह आणि इतर अनेक कंटेंटसह, एअरटेल वायफाय ग्राहक आता 1.5 लाख तासांहून अधिक मोठ्या कंटेंट भंडाराचा आनंद उचलू शकतात.
Year Ender 2024: लिमिट वाढण्यापासून ते नवीन फीचर्सपर्यंत, यावर्षी किती बदलला UPI?
अमित त्रिपाठी, मुख्य विपणन अधिकारी आणि ईव्हीपी, ग्राहक अनुभव, भारती एअरटेल म्हणाले, “भागीदारी एअरटेलच्या डीएनएचा भाग आहे आणि आम्हाला ZEE5 सह भागीदारी करताना आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना जागतिक डिजिटल कंटेंट इकोसिस्टम प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ZEE5 ची समृद्ध लायब्ररी आमच्या कंटेंट पोर्टफोलिओमध्ये सखोलता वाढवते आणि आमच्या ग्राहकांचा अनुभव वाढवते. आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आमचा कंटेंट पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
ZEE5 चे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा म्हणाले, ‘ZEE5 वर, आमची वैविध्यपूर्ण कंटेंट लायब्ररी दर्शकांपर्यंत पोहोचवून उच्च दर्जाचे मनोरंजन सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. Airtel सोबतच्या या सहकार्यामुळे प्रेक्षकांना शैली, भाषा आणि फॉरमॅटमध्ये अखंड मनोरंजनाचा अनुभव देण्याचे आमचे वचन आणखी मजबूत होते.
एयरटेल Wi-Fi चे प्लॅन्स
BSNL 5G लाँचबाबत लेटेस्ट अपडेट, Jio-Airtel पेक्षा का स्वस्त असेल सर्व्हिस? जाणून घ्या
एअरटेल वायफाय ग्राहक एअरटेल थँक्स ॲपद्वारे मोफत ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ऍमेझॉन प्राइम (Amazon Prime), नेटफ्लिक्स (Netflix)
आणि हॉटस्टार (Hotstar) सारख्या विद्यमान प्लॅटफॉर्मसह ZEE5 च्या एकत्रीकरणामुळे, एअरटेल वायफाय ग्राहकांना आता उत्तम मनोरंजन पर्याय उपलब्ध आहेत.