
फोटो सौजन्य - Social Media
तुम्ही नवीन Google Pixel 10 घेण्याच्या विचारात असाल, तर ही संधी हातातून जाऊ देऊ नका! सध्या Amazon वर या दमदार फोनवर जबरदस्त सूट मिळत आहे. ही ऑफर लिमिटेड टाइमसाठीच आहे आणि त्यामुळे ग्राहकांना जवळपास ₹14,000 पर्यंतची बचत होऊ शकते. संपूर्ण पैसे देण्यापेक्षा बचत केलेली बरी! आणि आता त्याचीच वेळ आली आहे. संधी आहे तर त्या संधीचे सोने करण्यात कसलीही उशीर करू नका.
Google Pixel 10 वर अप्रतिम ऑफर
हा फ्लॅगशिप फोन गूगलने सुरुवातीला ₹79,999 मध्ये लॉन्च केला होता. मात्र, सध्या Amazon वर तो फक्त ₹68,429 मध्ये उपलब्ध आहे म्हणजेच तब्बल ₹11,570 ची थेट सूट! याशिवाय, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर EMI ट्रांजक्शन केल्यास ₹3,000 पर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट मिळतो. तसेच, तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून आणखी जास्त सवलत मिळवू शकता.
Google Pixel 10 चे खास फीचर्स
या मोबाईलमध्ये डिस्प्ले 6.3 इंच OLED, 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 निट्स ब्राइटनेस देण्यात आले आहे. प्रोटेक्शनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 देण्यात आला आहे. तसेच मोबाईलमध्ये प्रोसेसर गूगल Tensor G5 चिपसेट देण्यात आला आहे. मेमरी 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. बॅटरी 4,970 mAh क्षमता, 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
कॅमेरा पाहिला तर मागील कॅमेरा 48MP प्रायमरी + 13MP अल्ट्रा-वाइड + 10.8MP टेलीफोटो (5x ऑप्टिकल झूमसह) आहे तर फ्रंट कॅमेरा 10.5MP सेल्फी कॅमेरा आहे. Google Pixel 10 हा प्रीमियम कॅमेरा परफॉर्मन्स, स्वच्छ अँड्रॉइड अनुभव आणि दमदार गती शोधणाऱ्यांसाठी परफेक्ट पर्याय आहे. जर तुम्ही अपग्रेडचा विचार करत असाल, तर ही ऑफर नक्कीच हातची जाऊ देऊ नका!