Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

Apple vs Google: मोठ्या टेक कंपन्या दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारी करत आहेत. हे स्मार्टफोन्स आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्ससह मिड रेंज किंमतीत लाँच केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2026 | 07:47 PM
Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • आयफोन 17 ई 19 फेब्रुवारी रोजी लाँच केला जाणार
  • गुगल पिक्सेल 10 ए स्मार्टफोन 18 फेब्रुवारी रोजी लाँच केला जाणार
  • गुगल पिक्सेल 10 ए अधिक यूथफुल आणि कलरफुल अप्रोचसह लाँच केला जाऊ शकतो
iPhone vs Pixel: स्मार्टफोन मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठा धमाका होणार आहे. कारण येत्या काहीच दिवसांत Apple iPhone 17e आणि Google Pixel 10a हे दोन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केले जाणार आहेत. यूजर्सना बजेट किंमतीत फ्लॅगशिप परफॉर्मंस ऑफर करणार आहेत. रिपोर्टनुसार, गुगल पिक्सेल 10 ए स्मार्टफोन 18 फेब्रुवारी रोजी आणि अ‍ॅपलचा आयफोन 17 ई हा 19 फेब्रुवारी रोजी लाँच केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा स्मार्टफोन यूजर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे.

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

डिजाइन आणि डिस्प्ले

लीक्सनुसार, आयफोन 17 ई मध्ये मागील जनरेशन च्या तुलनेत अधिक चांगली डिझाईन दिली जाऊ शकते. यावेळी आयफोन मॉडेल जास्तस्लिम आणि प्रीमियम डिझाईनसह लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन रंगात लाँच केला जाऊ शकतो. या डिव्हाईसमध्ये 6.1-इंच OLED स्क्रीन असू शकते, ज्यामध्ये डायनॅमिक आईसलँड सपोर्ट दिला जाईल. या मॉडेलमध्ये देखील 60Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

गुगल पिक्सेल 10 ए बाबत रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, हा फोन अधिक यूथफुल आणि कलरफुल अप्रोचसह लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन निळा, हिरवा, लाल आणि काळा रंगात लाँच केला जाऊ शकतो. या डिव्हाईसमध्ये समोरील बाजूला होल-पंच कटआउट असणार आहे. गुगल पिक्सेल 10 ए मध्ये 6.3-इंच AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असू शकतो. ज्यामुळे आगामी आयफोनला टक्कर दिली जाऊ शकते.

प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेरा डिटेल्स

परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर आयफोन 17 ई अधिक दमदार असू शकतो. यामध्ये नवीन A19 चीप दिली जाण्याची शक्यता आहे, जी 3nm टेक्नोलॉजीर आधारित असणार आहे. यासोबतच कंपनीच्या आगामी डिव्हाईसमध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज ऑप्शन मिळू शकतो. गुगल पिक्सेल 10 एमध्ये गुगलचा नवीन टेंसर जी5 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, जो AI फीचर्स आणि कॅमेरा प्रोसेसिंगमध्ये मजबूत असणार आहे. गुगलच्या आगामी आयफोनमध्ये 8GB रॅम आणि अँड्रॉईड 16 आऊट ऑफ द बॉक्स असू शकतो.

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट

आगामी आयफोनमध्ये 25W पर्यंत मॅगसेफ वायरलेस चार्जिंगसह 4005mAh बॅटरी असू शकते. गुगल पिक्सेल 10 एमध्ये 5100mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

कॅमेरा

Apple यावेळी सिंगल मात्र पावरफुल कॅमेरा सेंसरसह एंट्री करू शकतो. 48MP रिअर कॅमेरा OIS सह आणि 18MP अपग्रेड केलेला सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी सेंटर स्टेज सपोर्ट असू शकतो. कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये पिक्सेल नेहमीच त्याची ताकद दाखवतो. या आगामी स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा असू शकतो. ज्यामध्ये 48 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स दिला जाणार आहे. डिव्हाईसमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा असू शकतो.

Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अ‍ॅप, असे असतील फीचर्स

अपेक्षित किंमत

गुगल पिक्सेल 10 ए हा 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. तर आयफोन 17 ई हा 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. पिक्सेल 10a फ्लिपकार्ट आणि गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर आयफोन १७ई अधिकृत अ‍ॅपल चॅनेलवरून उपलब्ध असेल.

Web Title: Apple iphone 17e vs google pixel 10a will users prefer which has better features know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • apple
  • google pixel
  • iphone

संबंधित बातम्या

अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड
1

अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर
2

भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर

Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स
3

Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.