Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनो सावधान! हा AI कॅमेरा केवळ चेहरा पाहून सांगणार सत्य

आता एक असा AI कॅमेरा लाँच केला जाणार आहे, जो तुमचा चेहरा बघून तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली की नाही हे सांगणार आहे. त्यामुळे आता ड्रींक अँड ड्राईव्ह प्रकरणात आरोपीच्या रक्ताची चाचणी करण्याआधी हा AI कॅमेरा सत्य उघड करू शकतो. या नवीन AI अल्गोरिदमच्या माध्यमातून देण्यात आलेला रिपोर्ट 75 टक्के अचूक असू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2024 | 12:42 PM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

देशात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ड्रींक अँड ड्राईव्हचं सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे पुणे पोर्श कार. या अपघातात 2 जणांनी त्यांचा जीव गमावला आणि ड्रींक अँड ड्राईव्ह करणारा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला निंबध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती. अल्पवयीन आरोपीला दिलेल्या या शिक्षेमुळे पुणे पोर्श कार प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं. पण या घटनेत आरोपी नक्की मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, याचा शोध घेण्यासाठी खूप वेळ लागला. त्यामुळे या प्रकरणात अनेक ट्विस्ट समोर येत गेले.

हेदेखील वाचा- लवकरच लाँच होणार आहे Xiaomi 14 Civi Limited Edition! पांडाप्रेमींसाठी असेल खास डिझाईन

पण आता एक असा AI कॅमेरा लाँच केला जाणार आहे, जो केवळ तुमचा चेहरा बघून तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली की नाही हे सांगणार आहे. त्यामुळे आता ड्रींक अँड ड्राईव्ह प्रकरणात आरोपीच्या रक्ताची चाचणी करण्याआधी हा AI कॅमेरा सत्य उघड करू शकतो. या नवीन AI अल्गोरिदमच्या माध्यमातून देण्यात आलेला रिपोर्ट 75 टक्के अचूक असू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. थर्टी फर्स्ट, ख्रिसमस अशा वेळी ड्रींक अँड ड्राईव्हच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. पण आता ह्या नव्या AI अल्गोरिदमच्या माध्यमातून ड्रींक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.

हेदेखील वाचा- Jio ने 1799 च्या किंमतीत लाँच केला UPI सपोर्ट आणि मोठी स्क्रीन असलेला फोन

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स आणि कॉम्प्युटर व्हिजन फाउंडेशन कॉन्फरन्स या AI प्रकल्पावर एकत्र काम करत आहेत. हा AI कॅमेरा संगणक स्टीयरिंग पॅटर्न, पेडल वापरणे आणि वाहनाचा वेग यासारख्या निरीक्षणात्मक वर्तनावर कार्य करतो. जेव्हा कार हलत असेल तेव्हाच ह्या कॅमेऱ्यामध्ये डेटा गोळा केला जाऊ शकतो. हा नवीन AI प्रोजेक्ट सिंगल कलर कॅमेरा वापरतो जो टक लावून पाहण्याची दिशा आणि डोक्याची स्थिती यांचे निरीक्षण करतो. हा AI कॅमेरा ड्रायव्हर स्टिअरिंगचा वापर कसा करत आहे ते त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांपर्यंत सर्व काही रेकॉर्ड करणार आहे.

Edith Cowan University चे एक डॉक्टरेटचे विद्यार्थी Ensiyeh Keshtkaran यांनी सांगितलं की, ड्रायव्हिंगच्या अगदी सुरुवातीला नशेची पातळी काय आहे हे शोधण्याची क्षमता आमच्या सिस्टममध्ये आहे. या अल्गोरिदमच्या माध्यमातून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या (world health organization)  मते, जगातील 20 ते 30 टक्के गंभीर कार अपघातांमागे दारू पिऊन वाहन चालवणे हे प्रमुख कारण आहे. पण आता AI अल्गोरिदमच्या मदतीने भविष्यात होणारे अपघात टाळता येतील.

Web Title: Beware of drunk drivers this ai camera will tell the truth just by looking at the face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • Driving Rules

संबंधित बातम्या

Ola-Uber ड्रायव्हर होण्याचा विचार करताय? कंपनी लवकरच लागू करणार ‘हा’ नियम
1

Ola-Uber ड्रायव्हर होण्याचा विचार करताय? कंपनी लवकरच लागू करणार ‘हा’ नियम

दुचाकीस्वारांनो लक्ष द्या ! केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ‘या’ निर्णयाला दिली मंजुरी
2

दुचाकीस्वारांनो लक्ष द्या ! केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ‘या’ निर्णयाला दिली मंजुरी

वाहन चालकांनो, कोणता नियम मोडल्यास किती हजारांचा दंड बसतो? जाणून घ्या पूर्ण माहिती
3

वाहन चालकांनो, कोणता नियम मोडल्यास किती हजारांचा दंड बसतो? जाणून घ्या पूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.