BSNL युजर्ससाठी आनंदाची बातमी! 35 हजार 4G साईट लाइव्ह, सरकारचा स्वस्त इंटरनेट प्लॅन, मोफत मिळेल 4G सिमकार्ट
टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमतींमध्ये वाढ केल्यानंतर अनेक युजर्स BSNL कडे वळले. ज्यांना स्वस्त इंटरनेट पाहिजे असेल त्यांचे आता अच्छे दिन येणार आहेत, कारण बीएसएनएलच्या 35 हजार 4G साइट लाईव्ह करण्यात आल्या आहेत. तसेच 7000 हून अधिक 4G मोबाईल टॉवर्सच्या रोलआउटचे काम पूर्ण झाले आहे. हे मोबाईल टॉवर भारतातील खेड्यापाड्यात नेटवर्क देण्याचे काम करतील. टेलिकॉम मिनिस्टर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घोषणा केली आहे की जून 2025 पर्यंत 1 लाख 4G साइट लाइव्ह केल्या जातील. अशा परिस्थितीत बीएसएनएलचे नेटवर्क प्रत्येक गावात पोहोचेल.
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे की, बीएसएनएल शहरांबरोबरच गावांमध्ये नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यात स्वस्त इंटरनेट पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सिंधिया म्हणाले की 1 लाख 4G टॉवर लाइव्ह केल्याने मोबाइल सेवा सुधारेल. तसेच नवीन सर्व्हिस सुरू करण्यात येणार आहेत.
हेदेखील वाचा – रणवीर अल्हाबादियाचे युट्युब अकाउंट हॅक! सर्व व्हिडिओ डिलीट, हॅकर्सने ठेवले हे नवीन नाव
4G रोलआउट सोबत, BSNL मोफत 4G सिम अपग्रेडची सुविधा देत आहे. जर तुम्हाला BSNL सिम हवे असेल तर तुम्हाला जवळच्या BSNL ऑफिसमध्ये जावे लागेल, तेथून तुम्हाला 4G BSNL सिम मोफत मिळू शकेल. सिम सक्रिय केल्यानंतर कंपनी मोफत 4G बोनस डेटा देत आहे. अशा परिस्थितीत, BSNL मध्ये आपले सिम पोर्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे, जेव्हा तुम्ही मोफत 4G BSNL डेटासह मोफत डेटाचा आनंद घेऊ शकाल.
हेदेखील वाचा – Emoji पाठवल्यास होऊ शकते जेल! या देशात आहे विचित्र नियम, उल्लंघन केल्यास भरावा लागेल 1 लाख रुपयांचा दंड
BSNL ने 4G लाँच केल्यानंतर 5G नेटवर्कची टेस्टिंग सुरू केली आहे. BSNL दिल्लीच्या मिंटो रोड आणि चाणक्यपुरी, IIT दिल्ली येथे 5G ट्रायल घेत आहे. BSNL दिवाळीपर्यंत देशभरात 5G ट्रायल रन करणार आहे. BSNL 5G नेटवर्क हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, तेजस नेटवर्क, विहान नेटवर्क, युनायटेड टेलिकॉम, कोरल टेलिकॉम, एचएफसीएल, टायडल वेव्ह आणि इतर सारख्या देशी दूरसंचार कंपन्यांच्या मदतीने आणले जात आहे.