भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब चॅनलवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. त्याचे दोन यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहेत. रणवीर हा भारतातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय युटूबर आहे, जो त्याच्या पॉडकास्टवर बॉलिवूड, क्रीडा, राजकारण आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतो. त्याच्याकडे दोन प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल आहेत, एक त्याच्या स्वत: च्या नावावर आहे आणि दुसरे बीयरबाइसेप्स आहे.
रणवीरच्या दोन्ही यूट्यूब चॅनलवर आता सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी त्याचे दोन्ही यूट्यूब चॅनल हॅक केले असून त्यांची नावदेखील बदलले आहेत. हॅकर्सनी त्याच्या लोकप्रिय चॅनल बीयरबाइसेप्सचे नाव बदलून “@Elon.trump.tesla_live2024” असे ठेवले, तर त्याच्या पर्सनल चॅनेलचे नाव बदलून “@Tesla.event.trump_2024” असे ठेवले. हॅकर्सनी या दोन्ही चॅनेलवरील रणवीरचे सर्व यूट्यूब व्हिडिओ डिलीट केले आहेत आणि त्याजागी डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्या जुन्या घटनांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत.
हेदेखील वाचा – Emoji पाठवल्यास होऊ शकते जेल! या देशात आहे विचित्र नियम, उल्लंघन केल्यास भरावा लागेल 1 लाख रुपयांचा दंड
हॅकर्सनी लाइव्ह स्ट्रीममध्ये क्यूआर कोड दाखवून लोकांना बिटकॉइन किंवा इथरियम elonweb.net वर पाठवण्यास सांगितले. कोणत्याही प्रसिद्ध व्यक्ती किंवा संस्थेचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, जिथे हॅकर्सनी सेलिब्रिटींच्या खात्यांमधून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लिंक शेअर केल्या आहेत. ही एक जुनी पद्धत आहे, जी लोकांना अडकवण्यासाठी वापरली जाते.
हेदेखील वाचा – Amazon Great Indian Festival 2024: 38 हजाराहून कमी किमतीत मिळत आहे iPhone 13
या हल्ल्याने रणवीर आणि त्याच्या टीमला धक्का बसला असून ते लवकरात लवकर त्यांचे चॅनेल रिस्टोअर व्हावेत यासाठी यूट्यूबशी संपर्क साधत आहेत. युट्युबने प्रथम त्यांचे चॅनेल काढून टाकण्याचा संदेश जारी केला, असे म्हटले की धोरणाचे उल्लंघन झाले आहे. भारतीय यूट्यूब चॅनेलवरील सायबर हल्ले सध्या चिंतेचा विषय बनले आहेत आणि रणवीरच्या चॅनेलच्या हॅकमुळे सायबर सुरक्षेची गरज आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरक्षा सुधारण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान या हॅकिंगचा आता रणवीरच्या करियरवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. याबाबत रणवीरने सोशल मीडियावर एक पोस्टदेखील शेअर केली ज्यात त्याने करियरविषयीची आपली व्यथा मांडली आहे. यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले हे मात्र नक्की.