फोटो सौजन्य -pinterest
JIO, Airtel आणि VI या कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर ग्राहक BSNL कडे वळले. यानंतर BSNL ने देखील त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन ऑफर्स सुरु केल्या. त्यामुळे अनेकांनी त्यांचे नंबर्स BSNL मध्ये पोर्ट करण्याचा निर्णय घेतला. तसेच अनेकांनी BSNL चे सिम कार्ड खरेदी करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांतच BSNL सिमची विक्री 3 पटीने वाढली आहे. तुम्ही सुध्दा तुमचं सिम कार्ड BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार करत आहात का किंवा तुम्हाला BSNL चं नवीन सिम कार्ड खरेदी करायचं आहे का? मग आता यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.
तुम्ही घरी बसून BSNL चं सिम कार्ड ऑर्डर करू शकता. आणि कंपनी तुमच्या नव्या सिम कार्डची Home Delivery करणार. BSNL ने Prune अॅप आणि LILO अॅपसोबत सिम कार्ड Home Delivery साठी करार केला आहे. त्यामुळे आता तुम्हाला जर BSNL चं नवीन सिम कार्ड खरेदी करायचं असेल तर तुम्ही Prune अॅपचा वापर करू शकता. ग़ाज़ियाबाद, गुरुग्राम आणि त्रिवेंद्रममध्ये BSNL नव्या सिम कार्डची Home Delivery सेवा सुरु केली आहे. लवकरच ही सेवा सर्वत्र सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे. BSNL सिम कार्ड ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
BSNL च्या सिमकार्ड विक्री सोबतच लाखो युजर्सनी त्यांचे सिम BSNL मध्ये पोर्ट केलं आहे. तुम्हाला तुमचा JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचं आहे का? यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, ज्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमचं JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करू शकता.