फोटो सौजन्य -iStock
हल्ली ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा लोकं ऑनलाईन वस्तू खरेदी करणे अधिक फायदेशीर समजतात. ऑनलाईन शॉपिंगमुळे आपला प्रवासाचा वेळ आणि पैशाची बचत होते. Flipkart, Messho, Amazon, Mynta असे अनेक ऑनलाईन शॉपिंगचे अॅप्स आहेत. या अॅप्समध्ये ऑनलाईन शॉपिंग करणं लोकांना अधिक आवडतं. त्यामुळे हे अॅप्स देखील त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक नवीन ऑफर्स आणि सेल घेऊन येत असतात. आता असाच एक सेल Amazon देखील घेऊन येत आहे. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा Amazon Prime Day Sale ची अगदी आपण सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतो.
Amazon Prime Day Sale 2024 हा 20 आणि 21 जुलै रोजी होणार आहे. Prime Day Sale हा केवळ Amazon प्राइम सदस्यांसाठीच असणार आहे. Amazon Prime Day Sale मध्ये कंपनी अनेक डील आणि वस्तूंवर बंपर डिस्काऊंट देणार आहे. गॅजेट्स आणि घरगुती वस्तूंपासून फॅशनपर्यंतच्या सर्व गोष्टी Amazon प्राइम सदस्यांना स्वस्त किंमतीत मिळणार आहेत. तुम्ही सुध्दा जर Amazon प्राइम सदस्य असाल, तर तुम्हालाही बंपर ऑफर्ससह मनसोक्त शॉपिंग करता येणार आहे. पण Amazon सेलमधून खरेदी कराताना तुम्ही जर काही ट्रीक्सचा वापर केला तर सेलमधील डिस्काऊंट आणि बंपर ऑफर्स तुम्ही अगदी सहज शोधू शकता.
या सेलमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही प्राइम मेंबर असणे आवश्यक आहे. तुम्ही Amazon प्राइम मेंबर नसाल तर लगेच Amazon Prime ची मेंबरशीप घ्या, ज्यामुळे तुम्ही या सेलमध्ये सहभागी होऊ शकाल. तुम्हाला असंख्य सवलतींपासून ते मोफत एकदिवसीय डिलीव्हरीपर्यंत असे अनेक फायदे मिळतील. यासोबतच तुम्हाला Amazon Prime Video आणि Amazon Music चा ॲक्सेस देखील मिळेल. त्यामुळे Amazon Prime ची मेंबरशीप तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.
Amazon Prime Day Sale 2024 मध्ये ग्राहकांना Amazon Prime ICICI बँक क्रेडिट कार्डने पैसे भरून कॅशबॅकचा जबरदस्त फायदा मिळतो. यासाठी तुम्ही ICICI बँक किंवा Amazon वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. एकापेक्षा जास्त वस्तू खरेदी केल्यास ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
तुम्ही Amazon ॲप उघडता तेव्हा तुम्हाला सर्वात वर टुडे डील दिसेल. तुम्हाला यावर लक्ष ठेवावे लागेल, ज्यामुळे तुम्ही मोठी बचत करू शकता. दिवसातील सर्वात फायदेशीर डीलची यादी तुम्हाला येथे दिसते. तुम्ही टुडे डील तपासत राहा आणि लगेच ऑर्डर देत रहा. ज्यामुळे तुमची मोठी बचत होईल.
Amazon कडून कूपन डिस्काउंट दिला जातो. बऱ्याच वेळा, 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत कूपन डिस्काउंट इलेक्ट्रॉनिक्सवर उपलब्ध असतात. म्हणून, तुमच्यासाठी कूपन डिस्काऊंटवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
प्रोटीन बार किंवा शैम्पू सारख्या काही आवश्यक उत्पादनांवर सबस्क्रिप्शन पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही हे निवडून अतिरिक्त बचत करू शकता आणि तुम्हाला ह्या वस्तू पुन्हा कधी ऑर्डर करायचे आहे हे देखील ठरवू शकता.