टेलिग्राम ॲपचे सीईओ Pavel Durov यांना पॅरिसमध्ये अटक; काय आहे कारण (फोटो सौजन्य - pinterest)
लोकप्रिय मॅसेजिंग ॲप टेलिग्रामचे सीईओ Pavel Durov यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. Pavel Durov यांना काल शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या बाहेरील बोर्जेट विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. Pavel Durov यांना कोणात्या कारणामुळे अटक करण्यात आली आहे, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. Pavel Durov यांच्या अटकेमागे कोणतं राजकीय कारण आहे, अशी चर्चा सर्वत्र केली जात होती. मात्र आता अखेर Pavel Durov यांच्या अटकेमागचं कारण समोर आलं आहे.
हेदेखील वाचा- 5G नेटवर्क वापरूनही मोबाईल इंटरनेटचा स्पीड कमी! ही सेटिंग देईल तुम्हाला सुपरफास्ट नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार, अब्जाधीश संस्थापक आणि टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे सीईओ Pavel Durov यांना शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या बाहेरील बोर्जेट विमानतळावरून अटक करण्यात आली. Pavel Durov त्यांच्या खासगी जेटने प्रवास करत होते. ते बोर्जेट विमानतळावर पोहोचताच त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. Pavel Durov त्यांच्या खासगी जेटने अझरबैजानला जात होते. टेलिग्राम ॲपशी संबंधित एका प्रकरणात Pavel Durov यांना अटक करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. फ्रेंच पोलिसांनी टेलीग्रामवर नियंत्रकांच्या कमतरतेवर त्यांचा तपास केंद्रित केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की नियंत्रकांच्या कमतरतेमुळे मेसेजिंग ॲपवरील गुन्हेगारी क्रियाकलाप अव्याहतपणे सुरू राहू शकतात.
पोलिसांचा असा विश्वास आहे की मॉडरेटरच्या कमतरतेमुळे मेसेजिंग ॲपवर गुन्हेगारी कृत्ये विनाअडथळा पुढे जाऊ शकतात. याच प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी Pavel Durov यांना फ्रान्समध्ये अटक केली आहे. या प्रकरणी टेलिग्रामने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फ्रान्सचे गृहमंत्री आणि पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेदेखील वाचा- Instagram ने लाँच केलं नवीन फीचर, प्रोफाईल होणार आणखी मजेदार! प्रोफाईलमध्ये मिळणार म्युझिक ॲड करण्याचं ऑप्शन
मेसेजिंग ॲप टेलीग्राम हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी संवादाचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. क्रेमलिन आणि रशियन सरकार देखील त्यांच्या बातम्या शेअर करण्यासाठी या व्यासपीठाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अलीकडच्या काळात, टेलिग्राम हे अशा प्लॅटफॉर्मपैकी एक बनले आहे जिथून रशियन युद्धाची माहिती मिळू शकते. यामुळे हिंसा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. दुबईस्थित टेलिग्रामची स्थापना रशियन वंशाच्या दुरोव यांनी केली होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रशिया आणि युक्रेनसह पूर्वीच्या सोव्हिएत देशांमध्ये, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम नंतर टेलिग्राम हे सर्वात प्रमुख मेसेजिंग ॲप आहे.
काही दिवसांपूर्वी Pavel Durov यांनी एक पोस्ट केली होती, आणि त्या पोस्टमुळे ते प्रचंड चर्चेत होते. एक-दोन नव्हे तर 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप असल्याचा खुलासा Pavel Durov यांनी केला होता. या पोस्टनंतर Pavel Durov चर्चेत होते. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. Pavel Durov यांचा टेलिग्रामवर चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यामातून ते टेलिग्राम युजर्ससोबत अनेक गोष्टी शेअर करत असतात.