ChatGPT o3 vs Grok 4: AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी, Grok 4 च्या चूका पडल्या महागात
OpenAI चे AI मॉडेल ChatGPT o3 ने एलन मस्कची कंपनी xAI च्या Grok 4 ला मागे टाकलं आहे. कागलद्वारे AI बुद्धिबळ टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सुमारे तीन दिवस चालू होती आणि तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एलन मस्कच्या AI मॉडेलला मागे टाकत चॅटजीपीटीने बाजी मारली आहे. बुद्धिबळ स्पर्धेत चॅटजीपीटीने अव्वल स्थान पटकावलं आहे. तीन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेत, अनेक कंपन्यांचे जनरल-पर्पज लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) एकमेकांविरुद्ध उभे होते. विशेष म्हणजे यापैकी कोणतेही मॉडेल विशेषतः बुद्धिबळ खेळण्यासाठी डिझाइन केलेले नव्हते. मात्र तरी देखील या मॉडेल्सनी अत्यंत हुशारीने बुद्धिबळ खेळला.
कागलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत आठ मॉडेल्स सहभागी झाले होते. ज्यामध्ये ओपनएआई, xAI, गूगल, एंथ्रॉपिक आणि चीन कंपनीचे DeepSeek आणि Moonshot AI यांचा समावेश होता. ही स्पर्धा मानक बुद्धिबळ नियमांचे पालन करत आयोजित करण्यात आली होती. परंतु या स्पर्धेत प्रश्न नियमांचा नव्हता तर रणनीती आणि चालींच्या खेळात सामान्य AI कशा प्रकारे प्रतिसाद देते, याचा होता. AI मॉडेल्सयाची चाचणी घेण्यासाठी आणि त्यांचे बुद्धिमत्त्व तपासण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुगलचे जेमिनी मॉडेल तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि ओपनएआयच्या दुसऱ्या मॉडेलला मागे टाकले. (फोटो सौजन्य – Pinterest)
टूर्नामेंटच्या सुरुवातीला Grok 4 ने आघाडी घेतली होती, परंतु अंतिम फेरीत Grok 4 ने अनेक चूका केल्या, ज्यामुळे ChatGPT o3 ने आघाडी घेतली. ChatGPT o3 ने या चुकांचा फायदा घेतला आणि निर्णायक विजय मिळवला. शतरंज डॉट कॉमचे लेखक पेड्रो पिन्हाटा यांनी सांगितलं की, “सेमीफाइनलपर्यंत वाटतं होतं की ग्रोक 4 बाजी मारणार आहे. मात्र अंतिम फेरीत या मॉडेलने अनेक चूका केल्या. पण अंतिम सामन्यात ग्रोक 4 चा खेळ संपला. लाईव्ह कॉमेंट्री करणारे ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा यांनीही कबूल केले की ग्रोक वारंवार चुका करत होते, तर चॅटजीपीटीने स्थिर खेळ दाखवला. त्यामुळेच चॅटजीपीटी बाजी मारू शकला.
बुद्धिबळ स्पर्धेतील हा पराभव एलन मस्कने गांभीर्याने घेतला नाही आणि त्याने म्हटलं की, ग्रोकची दमदार कामगिरी हा फक्त एक “साइड इफेक्ट” होता. कारण xAI ने बुद्धिबळात जवळजवळ कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या निकालामुळे ओपनएआय आणि मस्कच्या xAI मधील स्पर्धा अधिक तीव्र झाली होती. बऱ्याच काळापासून बुद्धिबळाचा वापर एआयच्या क्षमता ओळखण्यासाठी केला जात आहे. भूतकाळात, गुगल डीपमाइंडच्या अल्फागो सारख्या विशेष एआय प्रणालींनी मानवी विजेत्यांना पराभूत करून इतिहास घडवला आहे, परंतु ही स्पर्धा खास होती कारण त्यात विशेष बुद्धिबळ इंजिनांची नाही तर सामान्य एआयची चाचणी घेण्यात आली.