फोटो सौजन्य- pinterest
सामान्य नागरिकांची फसणूक करण्यासाठी सायबर स्कॅमर नवनवीन पद्धती वापरत आहेत. कधी खोटे मॅसेज तर कधी खोटे कॉल. सध्या सायबर स्कॅमरकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी WhatsApp कॉलचा वापर केला जात आहे. तुमच्या WhatsApp वर अनोळखी नंबर वरून कॉल किंवा मॅसेज केला जातो, हा कॉल तूम्ही रिसीव्ह केला किंवा मॅसेजला रिप्लाय केला, तर तुमचं बँक अकाउंट पूर्णपणे रिकामं होईल. ज्या नंबरवरून कॉल केला जात आहे तो कोणताही भारतीय नंबर नसून आंतरराष्ट्रीय नंबर आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या WhatsApp वर कोणत्याही आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येत असतील, तर ताबडतोब सावध व्हा, अन्यथा तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडू शकता.
हेदेखील वाचा- World Wide Web day: अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच इंटरनेट बनली आहे आपली गरज
गेल्या काही महिन्यांत WhatsApp वर लोकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. जिथे ऑनलाइन फसवणूक करणारे सायबर स्कॅमर लोकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल करून अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी पार्ट टाईम काम देतात. पैसे कमविण्याची ऑफर ऐकताच अनेकजण सायबर स्कॅमरच्या जाळ्यात अडकतात. पैसे कमावण्याच्या नादात आतापर्यंत अनेकजण या फसवणुकीचे बळी ठरले आहेत.
हेदेखील वाचा- जबरदस्त फीचर्ससह Poco M6 Plus 5G आज होणार लाँच! जाणून घ्या किंमत
WhatsApp युजर्स त्वरीत येणारे कॉल फ्रॉड आहेत का नाही हे ओळखू शकत नाहीत, त्यामुळे अनेकदा अशा फसवणुकीना बळी पडतात. कॉल वरील आवाज ऐकून समोरची व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं हे ओळखणे सोपं नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सायबर स्कॅमरचा फोन ओळखण्यासाठी मदत होऊ शकते. सायबर स्कॅमर दिवसातून दोन ते तीन वेळा फोन करतात. कधी कधी दोन दिवसांतून एकदा फोन येतो. तुम्ही कॉल उचलल्यानंतर, सायबर स्कॅमर स्वतःची एचआर म्हणून ओळख करून देतात आणि तुम्हाला पार्ट टाईम नोकरीची ऑफर देतात.
सायबर स्कॅमर तुम्हाला review लिहिण्यास किंवा YouTube व्हिडिओ लाइक करण्यास सांगतील. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी, काही वेळा सायबर स्कॅमर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये थोडेफार पैसेही पाठवतात. विश्वास संपादन केल्यानंतर तुम्हाला एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर तुम्हाला त्या ॲपमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले जाईल. एकदा त्या ॲपमध्ये गुंतवणूक केली की तुम्ही ते पैसे पुन्हा काढू शकत नाही. तुमच्या सोबत अशी कोणतीही घटना घडली तर समजून घ्या की तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी ठरला आहात. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी, जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय नंबरवरून वारंवार कॉल येत असतील. तर तो नंबर लगेच ब्लॉक करा. अशा कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नका.
Whatsapp वर तुम्हाला +212 आणि +27 कोडवरून कॉल्स येत असतील तर सावध व्हा. सायबर स्कॅमरकडून लोकांची फसवणुक करण्यासाठी हे कॉल केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इथिओपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), व्हिएतनाम (+84) येथूनही लोकांना आंतरराष्ट्रीय कॉल येत आहेत.