फोटो सौजन्य - pinterest
सध्या देशभरात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर स्कॅमर सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी अनेक नवीन मार्ग शोधत आहे. सायबर स्कॅमर लोकांची फसवणूक करण्यासाठी खोटे ॲप, बनावट वेबसाईट किंवा खोटे कॉल करतात. हे लोकं एवढ्यावरचं थांबत नाहीत, अनेकदा हे सायबर स्कॅमर लोकांचे सोशल मिडीया अकाऊंट देखील हॅक करतात. काही दिवसांपूर्वीच अनेकांचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं होतं.
हेदेखील वाचा- कसा होतो ऑनलाईन फ्रॉड? ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी ‘या’ टीप्स फॉलो करा
इंस्टाग्राम युजर्सना एका अनोखळी अकाऊंटवरून लिंक पाठवली जात होती. या लिंकवर क्लिक केल्यास युजर्सच अकाऊंट हॅक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अकाऊंट हॅक झाल्यानंतर ते परत मिळवणं कठीण असतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याच्या गोपनीयतेमुळे खूप लोकप्रिय असले तरी, तरीही युजर्सचे अकाऊंट हॅक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इंस्टाग्रामच्या या ट्रेंडनंतर आता सायबर स्कॅमर टेलिग्राम या लोकप्रिय सोशल मिडीया प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. अलीकडेच ESET संशोधकांनी उघड केलं आहे की हॅकर्स टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून तुम्हाला धोकादायक फाइल्स पाठवू शकतात. या फाईल व्हिडिओसारख्या दिसतात. या फाईल टेलिग्राम ॲपमध्ये ओपन होत नाही, त्यासाठी तुम्हाला दुसरे ॲप डाऊनलोड करावे लागतात. हे ॲप डाऊनलोड करताच तुमचा फोन हॅक होतो आणि तुमच्या फोनमधील डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचतो. तुमचं टेलिग्राम अकाऊंट हॅक झालं आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखणार?
हेदेखील वाचा- तुमच्या स्लो Wi-Fi नेटवर्कमुळे हैराण झाला आहात? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा
जर तुमच्या टेलिग्राम अकाऊंटमधून चॅट किंवा काही संदेश पाठवले गेले आहेत जे तुम्ही पाठवले नाहीत, तर याचा अर्थ असा आहे की तुमचे टेलिग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. याशिवाय, जर तुमच्या अकाऊंटचा प्रोफाइल फोटो, बायो, युजरनेम किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये काही बदल झाला तर तुमचं अकाऊंट देखील हॅक झालेलं असू शकतं. अकाऊंटमधून कोणत्याही प्रकारचं पेमेंट किंवा सबस्क्रिप्शन घेतलं असल्यास तुमचं अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असते. अकाऊंट हॅक झाल्यानंतर, आपल्याला वैयक्तिक माहिती विचारणारे संशयास्पद संदेश येत राहतात. या चिन्हांद्वारे तुम्हाला कळेल की तुमचं अकाऊंट हॅक झालं आहे. अकाऊंट झाल्यानंतर नक्की काय करावं, हे अनेकांना माहिती नसतं. यासाठी तुम्हाला काही सोप्सा स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये टेलिग्राम ओपन करा आणि सेटिंग्जमध्ये जा. यानंतर डिव्हाइस पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सर्व बेकायदेशीर लिंक्स काढून टाकाव्या लागतील. तसेच टू फॅक्टर व्हेरिफिकेशन फीचर चालू करा. टू फॅक्टर व्हेरिफिकेशन फीचरमुळे तुमचं अकाऊंट अधिक सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल. याशिवाय तुम्हाला एक नवीन आणि मजबूत पासवर्ड तयार करणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये काही संशयास्पद वाटल्यास ताबडतोब टेलिग्राम सपोर्टची मदत घ्या.