फोटो सौजन्य -iStock
आपण आपला मोबाईल, टॅबलेट आणि स्मार्ट टिव्ही Wi-Fi सोबत कनेक्ट केल्यास चांगला अनुभव मिळतो. आपल्या मोबाईल किंवा स्मार्ट टिव्हीला Wi-Fi कनेक्ट करून आपण सिनेमा, वेब सिरीज, गाणी, युट्यूबवरील व्हिडीओ या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. काहीवेळा Wi-Fi योग्यरित्या कार्य करत नाही, परिणामी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अनुभव खराब होतो. काहीवेळा Wi-Fi अतिशय स्लो चालतो, त्यामुळे आपली कामं रखडली जातात. स्लो Wi-Fi मुळे सिनेमा, वेब सिरीज, गाणी, युट्यूबरील व्हिडीओ अडखळतात. स्लो इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे महत्त्वाची कामेही अडकून पडतात. पण आता आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्लो Wi-Fi चा स्पीड पुन्हा पूर्वीसारखा करू शकता.
हेदेखील वाचा- Vivo Y18i vs POCO F6: कोणता फोन देईल तुम्हाला बेस्ट फीचर्स; वाचा सविस्तर
Wi-Fi वर तुमचे इंटरनेट स्लो असण्याचं सामान्य कारण म्हणजे तुमच्यातील आणि राउटरमधील अंतर. तुम्ही तुमच्या Wi-Fi च्या वायरलेस राउटरपासून जितके दूर असाल, तेवढा तुमचा Wi-Fi इंटरनेट स्लो चालेल. तुम्ही तुमच्या राउटरपासून जितके दूर असाल तितका तुमचा इंटरनेट स्पीड कमी होईल. जर तुमचा वायरलेस राउटर दोन किंवा अधिक खोल्यांच्या अंतरावर असेल, तर तुम्हाला कनेक्शन तुटण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्यामुळे तुम्ही पाहत असलेला सिनेमा, वेब सिरीज, गाणी किंवा युट्यूबरील व्हिडीओ अडखळू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा Wi-Fi इंटरनेट स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही राउटरपासून दूर आहात का, हे आधी तपासा.
हेदेखील वाचा- PUBG Mobile hacks: प्रत्येक सोलो मॅचमध्ये ठराल अव्वल! बॅटलमध्ये उतरण्यापूर्वी फॉलो करा ‘या’ टीप्स
जर तुमच्या Wi-Fi इंटरनेटचा स्पीड स्लो झाला असेल तर तुमच्या Wi-Fi राउटरला किती डिव्हाइस कनेक्ट आहेत, हे तपासा. तुमच्या Wi-Fi राउटरला अनेक डिव्हाइस कनेक्ट असणं हे देखील तुमच्या Wi-Fi इंटरनेटचा स्पीड स्लो झाल्याचं कारण असू शकतं. तुमच्या Wi-Fi राउटरला जितके कमी डिव्हाइस कनेक्ट असतील, तितका तुमच्या Wi-Fi इंटरनेटचा स्पीड फास्ट असेल.
अनेकदा असं होतं की आपण नवीन Wi-Fi कनेक्शन घेतो, पण जुनाच राउटर वापरतो. स्लो इंटरनेटमागे हे देखील कारण असू शकतं. तुम्ही जुना राउटर वापरत असाल आणि तुमच्या Wi-Fi इंटरनेटचा स्पीड स्लो असेल, तर तुम्ही सर्वात आधी तुमचा राउटर बदलून पाहा. ज्यामुळे तुमच्या इंटरनेटचा स्पीड फास्ट होऊ शकतो.
सध्याचे Wi-Fi राउटर दोन बँडवर काम करतात, त्यापैकी एक 5GHz बँड आहे. 5GHz बँडमुळे तुम्हाला फास्ट इंटरनेट स्पीड मिळते. तसेच 5GHz बँडमुळे तुमच्या Wi-Fi इंटरनेटमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही.