Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल, 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन आणि 11 लाख व्हॉट्सॲप अकाउंट्सवरही बंदी

फसवणूक आणि स्पॅम कॉलवर कारवाई करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. 1.77 कोटी बनावट मोबाईल कनेक्शन तोडण्यात आले आहेत. यामध्ये सायबर गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या सुमारे 34 लाख मोबाईल कनेक्शनचा समावेश आहे. याशिवाय 11 लाख व्हॉट्सॲप अकाऊंट आणि 71 हजार सिम एजंटही ब्लॉक करण्यात आले आहेत. हे नवीन दूरसंचार नियमांनुसार लागू झाले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2024 | 02:38 PM
स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल, 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन आणि 11 लाख व्हॉट्सॲप अकाउंट्सवरही बंदी

स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल, 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन आणि 11 लाख व्हॉट्सॲप अकाउंट्सवरही बंदी

Follow Us
Close
Follow Us:

फसवणूक आणि स्पॅम कॉल्सना रोखण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने कोट्यावधी मोबाइल कनेक्शन आणि लाखो व्हॉट्सॲप अकाउंटवर बंदी घातली आहे. यामध्ये बनावट कागदपत्रांद्वारे घेतलेल्या कनेक्शन्सचा आणि ज्यांच्यावर संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत, अशा कनेक्शन्सचा समावेश आहे. दूरसंचार विभाग (DoT) सोबत काम करणाऱ्या चार दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (TSPs) 45 लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स भारतीय दूरसंचार नेटवर्कपर्यंत पोहोचण्यापासून रोखले आहेत. याशिवाय काही व्हॉट्सॲप अकाउंटलाही टार्गेट करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – WhatsApp Story Update: व्हॉट्सॲपवर आलं नवीन अपडेट, इंस्टाग्राम स्टोरीप्रमाणे व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर

1.77 कोटी मोबाईल कनेक्शन तोडले

1 ऑक्टोबरपासून देशभरात नवीन दूरसंचार नियम लागू झाले आहेत. सरकारने ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन हे नियम लागू केले. आता फसवणूक आणि स्पॅम कॉलला आळा घालण्यासाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन बंद केले आहेत. बनावट कागदपत्रे वापरून घेण्यात आलेल्या मोबाईल कनेक्शन्सवर ही कारवाई करण्यात आली. (फोटो सौजन्य – pinterest)

सायबर गुन्ह्यांचा समावेश

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, खंडित केलेल्या मोबाईल कनेक्शनपैकी 33.48 लाख कनेक्शनचा वापर कधीतरी सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात आला होता. 77.61 लाख कनेक्शन्स असे आहेत जे टेलिकॉम नियमांच्या विरोधात होते. एवढेच नाही तर सरकारने त्या हँडसेटवरही हंटर लाँच केले आहे, ज्यांचा सायबर गुन्ह्यांमध्ये किंवा फसवणुकीमध्ये वापर केला गेला आहे.

हेदेखील वाचा – Lava Agni 3 5G vs OnePlus Nord 4: कोणता स्मार्टफोन देणार दमदार फीचर्स? वाचा कोण करणार तुमचे पैसे वसूल

व्हॉट्सॲप अकाउंटवर बंदी

खंडित मोबाइल कनेक्शनशी जोडलेली 11 लाख बँक खाती आणि पेमेंट वॉलेट फ्रीज करण्यात आले आहेत. यासोबतच अंदाजे 11 लाख व्हॉट्सॲप अकाउंटही बंद करण्यात आली आहेत. मंत्रालयाने 71 हजार पॉइंट ऑफ सेल म्हणजेच सिम एजंट्सनाही ब्लॉक केले आहे.

केंद्राने शुक्रवारी सांगितले की, आतापर्यंत बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेले 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत. हे कनेक्शन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे ओळखले गेले आहेत. पुढे, दूरसंचार विभाग (DoT) च्या सहकार्याने चार दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (TSPs) यशस्वीरित्या एक प्रगत प्रणाली लागू केली आहे. दूरसंचार मंत्रालयाने सांगितले की पुढच्या टप्प्यात एक केंद्रीकृत प्रणाली स्थापित केली जात आहे जी सर्व TSP मध्ये उर्वरित बनावट कॉल दूर करेल. ही प्रणाली लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. DOT ने प्रगत प्रणाली आणली आहे. हे आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ओळखण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ते ब्लॉक करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

49,930 मोबाईल हँडसेट ब्लॉक

मंत्रालयाने सांगितले की, सायबर गुन्ह्यांचे हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यांमध्ये 1.77 कोटींपैकी 33.48 लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले 49,930 मोबाईल हँडसेटही ब्लॉक करण्यात आले आहेत. मर्यादेपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन घेतलेल्या लोकांचे 77.61 लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.

Web Title: Department of telecommunications block 1 77 crore mobile connection and 11 lakhs whatsapp account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 02:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.