लोकप्रिय मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर एक नवीन फीचर आलं आहे. नवीन अपडेटनंतर, व्हॉट्सॲपचे स्टेटस बरेचसे इंस्टाग्राम स्टोरीजसारखे झाले आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये कोणालाही टॅग करू शकता. परंतु व्हॉट्सॲपचा एक फायदा असा आहे की तुम्ही एखाद्याला खाजगीरित्या टॅग करू शकाल. शिवाय तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये दुसऱ्याचे स्टेटस देखील शेअर करू शकाल. सध्या, फक्त काही लोकांना नवीन फीचरचे अपडेट मिळाले आहे परंतु पुढील आठवड्यापर्यंत ते सर्वांसाठी रिलीज केले जाईल.
व्हॉट्सॲपवर आलं नवीन अपडेट, इंस्टाग्राम स्टोरीप्रमाणे व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये मिळणार 'हे' खास फीचर (फोटो सौजन्य- pinterest)
मेटा-मालकीच्या इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने स्टेटसबाबत दोन नवीन अपडेट्स जारी केल्या आहेत.
नवीन अपडेटनंतर, तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये एखाद्याला टॅग करू शकता आणि एखाद्याचे स्टेटस री-शेअर देखील करू शकता.
व्हॉट्सॲपचे हे फीचर हळूहळू अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी लाँच केलं जात आहे.
व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला टॅग करणार आहात केवळ त्याच व्यक्तिला तो मॅसेज जाईल. तुम्ही कोणाला टॅग केले हे इतर युजर्सना कळणार नाही.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्याने तुम्हाला त्याच्या स्टेटसमध्ये टॅग केले असेल, तर तुम्ही ते स्टेटस पुन्हा शेअर करू शकाल.
हे फीचर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आधीपासूनच आहे. व्हॉट्सॲपने आपल्या ब्लॉगवर या नवीन फीचरची माहिती दिली आहे.