WhatsApp stickers आणि GIF चा वापर करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठवा (फोटो सौजन्य -pinterest)
भारत आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आज शाळा, कॉलेज, ऑफिस, सोसायटी सगळीकडे स्वांत्र्यादिन साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी अनेक जण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना मेसेज करून किंवा कॉल करून स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा देतात. पण तुम्ही आता डिजिटली सुद्धा स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. WhatsApp युजर्स WhatsApp Stickers किंवा GIF च्या माध्यमातून आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात. व्हॉट्सॲपच्या या फीचर्सचा वापर करून तुम्ही स्वातंत्र्य दिन आणखी खास बनवू शकता.
हेदेखील वाचा- Independence Day 2024: भारताच्या तिरंग्या सोबत सेल्फी अपलोड करा आणि मिळवा हर घर तिरंगा सर्टिफिकेट
WhatsApp Stickers किंवा GIF च्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्याचा आनंद नकीच दुप्पट होईल. याशिवाय तुम्ही हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होत सर्टिफिकेट देखील मिळवू शकता. यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या https://harghartiranga.com/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. भारताच्या तिरंग्या सोबत सेल्फी अपलोड करावा लागेल. यानंतर तुम्हाला हर घर तिरंगा सर्टिफिकेट मिळणार आहे.
हेदेखील वाचा- भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या दिवशी का साजरा करतात त्यांचा स्वतंत्रता दिवस? जाणून घ्या
व्हॉट्सॲपच्या GIF फीचरचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. प्रत्येकजण चॅटवर GIF फीचरचा वापर करतो. GIF फीचर सुरू झाल्यापासून यूजर्सना चॅटचा उत्तम अनुभव मिळत आहे. स्वातंत्र्य दिनाची थीम असलेली GIF कशी पाठवायची हे जाणून घ्या.
या व्यतिरिक्त, युजर्स स्वातंत्र्य दिनासाठी फोटो शोधण्यासाठी आणि तयार करण्यासाठी Canva आणि Pixabay ची मदत देखील घेऊ शकतात. वापरकर्ते विनामूल्य ऑनलाइन फोटो डाउनलोड करू शकतात.