everything you did not know your microwave oven can do nrvb
मायक्रोवेव्ह ओव्हन हे बहुदा स्वयंपाकघरातील आजवरचे सर्वात अष्टपैलू उपकरण आहे. आणि खरे सांगायचे झाले तर मायक्रोवेव्ह ओव्हन ही जर एक व्यक्ती असती तर ज्याच्याविषयी सर्वात जास्त गैरसमज झालेले असतात अशापैकी एक असती. याचे कारण बहुतेक ग्राहक मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर फक्त अन्न पुन्हा गरम करण्यापुरताच मर्यादित ठेवतात. त्याच्या विविध प्री-सेट मेनूसह, कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन स्वयंपाकघरातील सर्वात विश्वासार्ह मदतनीस म्हणून काम करू शकते आणि तुमचे आरोग्य जपून तुमचे श्रम आणि वेळ वाचवू शकते. जेवण पुन्हा गरम करण्यापलीकडे जाऊन मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग स्वयंपाक, एअर फ्राईंग, ग्रिलिंग, भाजणे, टोस्टिंग, बेकिंग, आंबवणे, डीफ्रॉस्टिंग, वाफाळणे आणि अगदी उकळण्यासाठी देखील करता येतो. त्यामुळे स्वयंपाकघरातील मोलाची जागा अडकवून ठेवणाऱ्या वेगवेगळ्या उपकरणांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज दूर होते. बेकरचा तर तो खरोखरच सर्वोत्तम सहाय्यक, खाद्यप्रेमींचा प्रयोगशील भागीदार, गृहिणीचा मित्र आणि कार्यरत व्यावसायिकांसाठी तारणहार आहे.
तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनचा तुम्ही जास्तीत जास्त कसा उपयोग करू शकता याच्या काही सूचना गोदरेज अप्लायन्सेसच्या मायक्रोवेव्ह ओव्हन्स विभागाचे प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव यांनी केल्या आहेत:
स्वतःला अन्न शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि मेहनत घ्यावी लागते यामुळे तर तुम्ही जर तुम्ही अनेकदा खाद्यपदार्थ बाहेरून ऑर्डर करत असाल तर मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये स्वयंपाक करण्याचा प्रयत्न तुम्ही करायलाच हवा. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये शिजवण्याचा प्रयत्न करा. 450+ 450 हून अधिक प्री-सेट ऑटो-कूक मेनूसह, तुम्हाला प्रत्येक डिश शिजवण्यासाठी तापमान आणि वेळ मॅन्युअली सेट करण्याची गरज नसते. फक्त तुम्ही हवे असलेले साहित्य घालायचे, प्री-प्रोग्राम केलेल्या मेनूमधून प्रमाण आणि कृती निवडायची आणि आपल्याला प्रत्यक्ष लक्ष ठेवत बसायच्या किंवा ढवळत बसायच्या ऐवजी मायक्रोवेव्ह ओव्हनला आपला आपला स्वयंपाक करू द्यावा. तुम्ही न्याहारीच्या पाककृतींपासून, सूप, करी, ब्रेड, भात आणि मिष्टान्न यांपासून १६ मिनिटात भात, ८ मिनिटात सुजी का हलवा आणि फक्त 10 मिनिटात करी असे तुमचे दैनंदिन पदार्थ बनवू शकता. भारतीय स्वयंपाकाच्या गरजेनुसार डिझाइन केलेली तडका मोडसह उपलब्ध अशी मॉडेल्सही आहेत.
[read_also content=”सॅमसंगने बेस्पोक साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटरच्या नवीन जाहिरातीमध्ये म्हटले आहे हा रेफ्रिजरेटर ‘द शोस्टॉपर’ असेल https://www.navarashtra.com/technology/samsung-will-be-the-showstopper-in-new-advert-for-bespoke-side-by-side-refrigerator-nrvb-399783.html”]
निरोगी जीवनशैली पाळणे आवडत असलेल्या आणि कॅलरीबद्दल जागरूक असलेल्या ग्राहकांसाठी हे आहे. पारंपारिक स्वयंपाक पद्धतींच्या तळण्याच्या प्रक्रियेच्या तुलनेत 90% तेल कमी वापरुन आणि तरीही चव न बिघडता फक्त काही थेंब तेलात तुम्ही कनव्हेक्शन मोड मध्ये एअर फ्राय करू शकता. शिवाय, मायक्रोवेव्ह ओव्हनच्या आत सर्व बाजूंनी उष्णता समान रीतीने वितरीत केली जात असल्याने, अन्नपदार्थ वारंवार ढवळण्याची, उलटे पालटे करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे प्रत्येक बाजू नीट तळली गेली आहे ना हे बघण्याचा वेळ आणि प्रयत्न कमी होतो. सर्व बाजूंनी पदार्थ व्यवस्थित तळला आणि शिजवला जातो. एकसमानता राहते. काही मॉडेल्स तर तुम्हाला एअर फ्रायिंग परिणाम सक्षम करण्यासाठी कमी तेल किंवा आरोग्यदायी फ्राय मोड देतात. तुम्ही तुमचे आवडते तळलेले पदार्थ जसे की समोसे, पकोडे, फ्रेंच फ्राईज आणि कटलेटचा आनंद १५ मिनिटांत आणि तेही मनात कुठलीही बोच न ठेवता घेऊ शकता.
तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्नपदार्थ वाफवणे खूप सोपे आहे आणि यास फक्त ४-६ मिनिटे लागतात. तुम्ही बटाटे, कॉर्न, ब्रोकोली किंवा इतर कोणत्याही भाज्या शिजवण्यासाठी आणि सलाड बनवण्यासाठी वापरू शकता किंवा तुमच्या पास्ता/नूडल्स किंवा करीमध्ये ते झटपट वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही झटपट वाफवलेले मोमो, डंपलिंग किंवा वाफवलेल्या इडल्या देखील बनवू शकता. प्री-सेट मेनू वापरून तुम्ही इडलीचा पर्याय देखील निवडू शकता आणि प्रेशर कुकरमध्ये वाफवण्यापेक्षा खूप जलद ५ मिनिटांत वाफवलेल्या इडल्या मिळवू शकता.
तुम्ही बेकरीमधून खरेदी करता ते सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शन मोडमध्ये घरी बनवू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना आश्चर्यचकित करायची इच्छा असेल तर मायक्रोवेव्हमध्ये बेक करून पहा. तुम्ही प्री-सेट मेन्यू वापरून बेक करायचे ठरवल्यास निवडलेल्या डिशच्या आधारे तापमान आणि वेळ सेटिंग्ज आपोआप केले जाते. बदलाबदली कमी होते आणि प्रत्येक वेळी तुम्हाला सातत्यपूर्ण परिणाम मिळतील याची खात्री होते. तुम्ही तुमचे आवडते केक, मफिन्स, फज, ब्रेड, कुकीज, बिस्किटे आणि अगदी पिझ्झा बेस मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये बेक करू शकता. तुम्ही काय बेक करत आहात त्यानुसार त्यासाठी फक्त १०-३० मिनिटे लागतात.
[read_also content=”सॅमसंगने बेस्पोक साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटरच्या नवीन जाहिरातीमध्ये म्हटले आहे हा रेफ्रिजरेटर ‘द शोस्टॉपर’ असेल https://www.navarashtra.com/technology/samsung-will-be-the-showstopper-in-new-advert-for-bespoke-side-by-side-refrigerator-nrvb-399783.html न सांगताच सोडलं ऑफिस, फोनही केला स्विच ऑफ, दिल्ली सरकारने IAS अधिकारी आशिष मोरेला धाडली नोटिस, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/india/issues-notice-to-services-secretary-ashish-more-delhi-government-for-gross-contempt-of-supreme-court-nrvb-399609/”]
तुम्ही घरी पार्टी आयोजित केली असेल आणि तुमच्या पाहुण्यांना काही स्वादिष्ट ग्रील्ड स्टार्टर्स खिलवायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही यापैकी काही झटपट मायक्रोवेव्ह ओव्हन रेसिपी करून बघितल्याच पाहिजेत. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये भाज्या तसेच मिट ग्रील करणे अत्यंत सोयीचे आणि जलद आहे कारण ते सर्व बाजूंनी गरम होते आणि पदार्थाचा कुरकुरीतपणा आणि आतील रसदारपणा टिकवून ठेवते. पुढच्या वेळी तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तेव्हा तुम्ही बार्बेक्यूसमोर वेळ न घालवता, ग्रील्ड कॉर्न, पनीर आणि मिट डिशमध्ये हर्बेड डिप्सचा पर्याय देऊन सर्व्ह करू शकता. इतकेच काय तर फक्त ८ मिनिटांत पिझ्झा, १० मिनिटांत गार्लिक ब्रेड, कबाब, प्रॉन्स, फिश किंवा व्हेज कटलेट किंवा चीज बॉल्स हे सर्व फक्त १५ मिनिटांत ग्रिल करू शकता.
तुम्हाला हे माहीत आहे का की पदार्थ आंबवायला साधारणपणे १०-१२ तास लागतात, पण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ते फक्त २ तासांत करता येते? याचे कारण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सतत ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान राखता येते जे किण्वन म्हणजेच अन्न आंबवण्यासाठी आवश्यक असलेले आदर्श तापमान आहे. समजा तुम्ही इडलीचे पिठ रात्री आंबवायला ठेवायचे विसरला असाल तरी काळजी करू नका. तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तुम्ही दिवसभरात ते कधीही करू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही डोसा पिठ, अप्पम पिठ, जिलेबी पिठ, ढोकळा पिठ आंबवू शकता. तुम्ही फक्त मायक्रोवेव्हमध्ये चालणाऱ्या एका मोठ्या भांड्यात ताजे बनवलेले पीठ घ्या आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवा. त्यानंतर फरमेन्टेशन मोड निवडा, वजन किती ते एन्टर करा आणि स्टार्टचे बटण दाबा.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 15 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-15-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
तुमच्या डीप फ्रीझरमध्ये साठवलेले गोठलेले पदार्थ डीफ्रॉस्ट होण्यास बराच वेळ लागतो परंतु जर तुम्हाला तुमचे जेवण लवकर तयार करायचे असेल आणि तासनतास वाट पाहण्याएवढा वेळ नसेल तर तुमच्या मायक्रोवेव्हमधील डीफ्रॉस्ट हा पर्याय तुमचा तारणहार ठरू शकतो. त्यामुळे अन्न शिजवले न जाता डीफ्रॉस्ट मोडमध्ये बर्फाचे स्फटिक वेगाने वितळतात आणि अन्न सामान्य तापमानावर येते. इन्व्हर्टर मायक्रोवेव्ह ओव्हन वापरल्याने पारंपारिक पद्धतीपेक्षा ४०% जलद डीफ्रॉस्टिंग सुनिश्चित होईल.
आता तुम्ही तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर करू शकता अशा विविध गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही आशा करतो की तुम्ही त्याचा सर्वोत्तम वापर कराल आणि स्वत:चा वेळ आणि श्रम वाचवाल!