सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वेळोवेळी युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतो. त्यातच आता मूळ कंपनी मेटा लवकरच फेसबुक मॉनटायझेशन प्रोग्रॅममध्ये काही बदल करणार आहे. मेटाच्या नवीन अपडेटनुसार, आता तीन क्रिएटर मॉनटायझेशन प्रोग्रॅममऐवजी, प्लॅटफॉर्मवर फक्त एक मॉनटायझेशन प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. यामुळे, क्रिएटर पूर्वीपेक्षा अधिक सहजपणे कमाई करू शकतील.
फेसबुकवरील सध्याच्या कमाई धोरणानुसार क्रिएटर तीन प्रकारे कमाई करू शकतात. यामध्ये जाहिराती, रील आणि परफॉर्मन्सच्या आधारे निर्मात्यांना पैसे मिळतात. पण आता मेटाने निर्मात्यांसाठी पैसे कमवणे आणखीन सोपे केले आहे. नवीन कमाई धोरणानुसार, क्रिएटर्सना आता कमाईसाठी फक्त एकदाच अप्लाय करावा लागेल. यानंतर तो प्लॅटफॉर्मवरून कोणत्याही प्रकारे कमाई करू शकतो. क्रिएटर्स सध्या प्लॅटफॉर्मवरून पूर्ण क्षमतेने कमाई करत नव्हते . मेटा ने नुकतीच याबाबत माहिती दिली होती. अशा परिस्थितीत आता क्रिएटर्सच्या सोयीसाठी नवीन मॉनटायझेशन प्रोग्रॅम आणला आहे.
हेदेखील वाचा – Google Pay’ची ट्रांजॅक्शन हिस्ट्री कशी डिलीट करावी? 99% लोकांना माहिती नाही ही ट्रिक, तुम्हाला माहिती आहे का?
मेटाच्या मते, नवीन मॉनटायझेशन प्रोग्रॅम मूळ प्रोग्रॅमप्रमाणेच काम करेल. क्रिएटर्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ, फोटो, टेक्स्ट फोटो आणि रील्सद्वारे कमाई करण्यास सक्षम असतील. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की मेटा निर्मात्यांना एक नवीन इनसाइड टॅब दिला जाईल. ज्यात , क्रिएटर्स वेगवेगळ्या कंटेंट फॉरमेटमधून कमाईचा डेटा सहजपणे राखण्यास सक्षम असतील. इतकेच नाही तर या कार्यक्रमाअंतर्गत क्रिएटर्सना कोणत्या पोस्ट किंवा व्हिडीओमधून किती पैसे कमावले आहेत हे देखील समजेल.
हेदेखील वाचा – व्हॉट्सॲपचे नवीन फिचर लाँच! आता फिल्टर आणि बॅकग्राऊंडसह व्हिडिओ कॉलिंग होणार अधिक मजेदार
सध्या मेटाचा हा नवीन मॉनटायझेशन प्रोग्रॅम बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. मात्र लवकरच हा सर्वांसाठी उपलब्ध केला जाईल. असा दावा आहे की, जवळजवळ 10 लाख क्रिएटर्स याच्याशी जोडले जातील, जे आधीच प्लॅटफॉर्मशी उपस्थित आहेत आणि कमाई करत आहेत.