लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या यादीत व्हॉट्सॲपचे नाव प्रामुख्याने समोर येते. आतापर्यंत व्हॉट्सॲपवर लाखोंच्या संख्येने ऍक्टिव्ह युजर्स आहेत. कॉलिंगपासून मेसेजिंगपर्यंत व्हॉट्सॲपवर अनेक गोष्टींचा लाभ घेता येतो. व्हॉट्सॲप हे जगभरातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. युजर्सच्या सोयीसाठी कंपनी आपल्या ॲपमध्ये नवनवीन फीचर्स जोडत असते. काही दिवसांपूर्वी, कंपनीने व्हिडिओ कॉलिंग सुधारण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये जोडली होती. त्यांनतर आता कंपनीने व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आणखीन सुधारणा करण्यासाठी फिल्टर आणि बैकग्राउंड फिचर जोडले आहे.
व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉन्फरन्स फीचरद्वारे कंपनी Google Meet, Microsoft Teams आणि Zoom सोबत स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी सतत नवीन फीचर्स जोडून युजर्सची अनुभव सुधारण्यावर भर देत आहे. आता कंपनीने यात दोन नवीन फीचर्स सादर केले आहेत. नवीन फीचर्समध्ये फिल्टर आणि बैकग्राउंड व्हिडिओ कॉल यासारख्या सुविधांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा – भारताचे नाणे जगभर चालेल, ऑनलाइन पेमेंट लोकांना आवडेल, NPCI’चा नवीन प्लॅन
युजर्स आता व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल दरम्यान नवीन फिल्टर वापरण्यास सक्षम असतील. त्यांच्या मदतीने, युजर्स व्हिडिओ कॉल दरम्यान आर्टिस्टिक फील अनुभवण्यास सक्षम असतील. यासह, नवीन बैकग्राउंड फिचर युजर्सना त्यांचे सराउंडिंग प्रायव्हेट ठेवण्यास मदत करेल. बैकग्राउंडच्या मदतीने ते त्यांच्या रूमला एक कॉफी शॉप किंवा कॅफेचे स्वरूप देऊ शकतील. यात व्हॉट्सॲपने 10 फिल्टर आणि बॅकग्राउंड सादर केले आहेत.
यासोबतच मेटाने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव सुधारण्यासाठी टच अप आणि लो लाइट फीचर्सही जोडले आहेत. त्याच्या मदतीने, युजर्स व्हिडिओ वाढवू शकतात आणि ब्राइटनेस वाढवू शकतात.
हेदेखील वाचा – 3 महिन्यांसाठी मिळणार Free Internet, ही कंपनी देत आहे Jio-Airtel’ला टक्कर
व्हॉट्सॲपने 1 टू 1 व्हिडिओ कॉल आणि ग्रुप व्हिडिओ कॉलसाठी फिल्टर आणि बैकग्राउंड फिचर जोडली आहेत. हे वापरण्यासाठी, युजर्सना इफेक्ट आयकॉनवर टॅप करावे लागेल. हा आयकन स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला दिसेल. या चिन्हावर टॅप केल्यावर, युजर्सना फिल्टर आणि बैकग्राउंड पर्याय दिसतील. युजर्स त्यांच्या आवडीनुसार त्यांचा वापर करू शकतात. व्हॉट्सॲपने हे फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत सर्व युजर्सना त्याचे अपडेट मिळणे सुरू होईल.