फ्लिपकार्ट बिग शॉपिंग उत्सव सेल झाला सुरू, सॅमसंग-गुगलसह या स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स
ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 27 सप्टेंबरापासून बिग बिलीयन डेज सेल सुरु करण्यात आला होता. 6 सप्टेंबर ही या सेलची शेवटची तारीख होती. या सेलमध्ये सर्व वस्तूंवर भरगोस सूट देण्यात आली होती. त्यामुळे कमी किंमतीत वस्तू खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत होती. त्यानंतर आता कंपनीने ग्राहकांसाठी एक नवीन सेल सुरु केला आहे. फ्लिपकार्ट बिग शॉपिंग उत्सव सेल आज 9 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. हा सेल 13 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सर्व वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
हेदेखील वाचा- Flipkart Big Billion Days Sale 2024: बिग बिलियन डेजमध्ये आयफोन आणि POCO स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी!
स्मार्टफोन, होम अप्लायन्सेस, टिव्ही, फ्रीज, गॅझेट्स, ब्रँडेड कपडे, शूज, अशा अनेक वस्तूंवर डिस्काऊंट देण्यात आलं आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सर्व गोष्टी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या सेलमध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तूवर जबरदस्त डिस्काऊंट आणि बंपर ऑफर्स मिळणार आहेत. तुम्ही नवरात्रीसाठी शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट बिग शॉपिंग उत्सव सेल एक उत्तम संधी ठरू शकते. (फोटो सौजन्य – फ्लिपकार्ट)
जर तुम्ही कमी बजेटमध्ये चांगल्या फीचर्ससह फोन शोधत असाल, तर Motorola G85 5G फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. या डिव्हाइसमध्ये 3D पोलेड डिस्प्ले आणि OIS सपोर्टसह 50MP सोनी कॅमेरा देण्यात आला आहे. तुम्ही हा फोन सेलमध्ये केवळ 15,999 रुपयांना खरेदी करू शकता.
Realme स्मार्टफोन कमी किंमत असूनही 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले ऑफर करतो आणि चांगल्या कामगिरीसाठी त्यात MediaTek Dimensity 7050 5G प्रोसेसर आहे. सेलमध्ये हा फोन 12,999 रुपयांना उपलब्ध आहे.
Flipkart सेलमध्ये खास फीचर्स असलेल्या Nothing Phone 2a फोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर ग्लिफ लाइट देण्यात आला आहे, जो नोटिफिकेशन इंडिकेटर म्हणून काम करतो.
हेदेखील वाचा- Flipkart Big Billion Days Sale 2024: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये लॅपटॉपवर मिळणार भरगोस डिस्काऊंट
सॅमसंगचा Galaxy AI फीचर देणारा Samsung Galaxy S23 5G फोन 39,999 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
Google Pixel 9 फ्लॅगशिप फोन सेलमध्ये 64,999 रुपयांना उपलब्ध आहे. प्रगत कॅमेरा सेटअप व्यतिरिक्त, या फोनमध्ये स्वच्छ Android अनुभव आणि अनेक उत्कृष्ट AI फीचर्स आहेत.
तुम्हाला सर्वात कमी किमतीत शक्तिशाली फीचर्स असलेला 5G फोन हवा असेल, तर Poco M6 5G हा एक चांगला पर्याय असू शकतो. फ्लिपकार्ट बिग शॉपिंग उत्सव सेलमध्ये तुम्हाला हा फोन 7200 रुपयांमध्ये मिळू शकेल. फोनमध्ये 50 MP कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे.