Flipkart Big Billion Days Sale 2024: बिग बिलियन डेजमध्ये आयफोन आणि POCO स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी!
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर अगदी काही क्षणातच सर्वात मोठा सेल म्हणजेच Flipkart Big Billion Days Sale 2024 सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max तसेच POCO स्मार्टफोन्सवर जबदस्त डिस्काऊंट मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्ही iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि POCO स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करू शकता.
हेदेखील वाचा- Myntra Fashion Festival: खरेदीसाठी तयार आहात का? सुरु होतोय Myntra Fashion Festival, कपडे, शूज, घड्याळावर जबरदस्त डिस्काऊंट
iPhone 15 Pro भारतात 1,34,000 रुपयांच्या किमतीत आणि iPhone 15 Pro Max 1,59,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. 128GB स्टोरेजसह iPhone 15 Pro चे बेस व्हेरिएंट फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान 99,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. या डिस्काऊंटशिवाय ॲपलच्या या फोनवर 5,000 रुपयांची सूट आणि 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे iPhone 15 Pro चे बेस व्हेरिएंट 89,999 किमतीत तुम्ही खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य- pinterest)
iPhone 15 Pro सोबत, iPhone 15 Pro Max देखील सेल दरम्यान 1,19,900 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असणार आहे. या मॉडेलवर 5,000 रुपयांची बँक सूट आणि 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. ऑफरनंतर iPhone 15 Pro Max ची किंमत 1,09,999 रुपये असणार आहे.
iPhone 15 Pro मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, जो प्रोमोशनसह येतो. हा Apple फोन A17 Pro चिप सह येतो, जो जबरदस्त परफॉर्मन्स तसेच उत्तम बॅटरी बॅकअप देतो. iPhone 15 pro मध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा आहे, जो हाय-रिझोल्यूशन फोटो क्लिक करतो. कंपनी iPhone 15 Pro आणि 15 Pro Max या दोन्ही स्मार्टफोनमध्ये Apple Intelligence फीचर ऑफर करते.
हेदेखील वाचा- फेस्टिव्हल सेलपूर्वी Amazon ने लाँच केलं AI Chatbot Rufus! ग्राहकांना कसा होणार फायदा, जाणून घ्या
POCO M6 Plus 5G स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा देखील आहे. हे केवळ मल्टीटास्किंगमध्येच उत्कृष्ट नाही तर फोटोग्राफीचा एक जबरदस्त अनुभव देखील देते. POCO M6 Plus 5G स्मार्टफोनमध्ये 5030mAh बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट करते. सेलमध्ये हा स्मार्टफोन 10,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.
POCO X6 Pro 5G परवडणाऱ्या किंमतीत तुम्हाला प्रमियम स्मार्टफोनचा आनंद देतो. त्याचा 1.4 MN AnTuTu स्कोअर, 1.5k डिस्प्ले आणि प्रगत कॅमेरा प्रणाली याला उत्तम पर्याय बनवते. हा स्मार्टफोन गेमर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि टेक्नॉलॉजी प्रेमींसाठी गेम चेंजर आहे. तुम्ही हा स्मार्टफोन 18,999 रुपयांना बिग बिलियन डेजमध्ये खरेदी करू शकता.
POCO F6 5G फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये नेक्स्ट-जनरल AI, शक्तिशाली प्रोसेसर, मोठा डिस्प्ले आणि प्रीमियम बिल्ड गुणवत्ता आहे. हा फ्लॅगशिप फोन सेलमध्ये फक्त 21,999 रुपयांना खरेदी करता येईल. POCO F6 5G च्या मदतीने तुमचा गेमिंग, फोटोग्राफीचा अनुभव अद्भुत होईल.
6.67-इंच 120Hz AMOLED FHD+ डिस्प्ले असलेला हा POCO X6 Neo 5G फोन सेलमध्ये 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 108MP ड्युअल एआय कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा सिस्टम देखील आहे, ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव उत्तम होतो.