फोटो सौजन्य - pinterest
Flipkart Minutes Service: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart ने Flipkart Minutes सर्विस सुरु केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेली ही सर्विस आता अखेर सुरु करण्यात आली आहे. Flipkart च्या या नवीन सर्विसमुळे आता अवघ्या 15 मिनिटांत तुमच्या सामानाची होम डिलीवरी होणार आहे. Flipkart ने 2 महिन्यांपूर्वी Flipkart Minutes सर्विसबाबत घोषणा केली होती. मात्र ही सर्विस नक्की कधी सुरु होणार याबाबत घोषणा करण्यात आली नव्हती.
हेदेखील वाचा- Elon Musk च्या न्युरालिंक कंपनीला मोठ यश! अर्धांगवायू असलेल्या रुग्णाचा मेंदू कंट्रोल करणार डिजिटल डिव्हाइस
Flipkart Minutes सर्विस 15 जुलैपर्यंत सुरु होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता ऑगस्टमध्ये Flipkart Minutes सर्विस सुरु करण्यात आली आहे. Flipkart Minutes सर्विसमुळे ग्राहकांना अवघ्या 15 मिनिटांत त्यांच्या सामानाची डिलीवरी मिळणार आहे. हल्ली बाजारात जाऊन सामान आणण्यापेक्षा लोक ऑनलाईन ऑर्डर करण्याला प्राधान्य देतात. कारण ऑनलाईन सामान ऑर्डर केल्यामुळे आपल्याला घरी बसून आपल्या सामानाची डिलीवरी मिळते. त्यामुळे आपल्याला बाजारात जावं लागतं नाही, त्यामुळे आपला वेळ वाचतो.
हेदेखील वाचा- रोबोट खिशात हात घालून पदक जिंकू शकतात का? ऑलिंपिक चॅम्पियन नेमबाजचा Elon Musk ला प्रश्न
आपण एखादी वस्तू ऑर्डर केली तर येण्यासाठी काही तास तर कधी कधी काही दिवस लागतात. पण आता Flipkart Minutes सर्विसमुळे तुम्हाला केवळ 15 मिनिटांत तुमच्या सामानाची डिलीव्हरी मिळणार आहे. त्यामुळे एखादी वस्तू ऑर्डर केल्यानंतर त्याच्या डिलीव्हरीसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. Blinkit, Zepto, BBNow आणि Instamart सारखे प्लॅटफॉर्मस आधीपासूनच सामानाची झटपट डिलीवरी देण्यासाठी कार्यरत आहेत. आता या शर्यतीत Flipkart देखील सामील झाले आहे. सामानाची झटपट डिलीवरी देण्यासाठी Flipkart ने Flipkart Minutes सर्विस सुरु केली आहे.
Flipkart Minutes सर्विसच्या माध्यमातून ऑर्डर केलेल्या सामानाची डिलीव्हरी लोकांना काही मिनिटांत मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्ट आता 8 ते 16 मिनिटांत इलेक्ट्रॉनिक्सपासून ते किराणा सामानापर्यंतच्या वस्तू डिलिव्हरी करेल. Flipkart Minutes सर्विसच्या आगमनाने, Instamart, Zepto आणि Blinkit सारख्या सेवांना बाजारपेठेत कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.
कंपनीने ही सर्विस बंगळुरू येथून सुरू केली आहे. मात्र लवकरच ही सेवा इतर शहरांमध्येही सुरू होऊ शकते. नवीन सेवा सध्याच्या फ्लिपकार्ट ॲपचा एक भाग बनवण्यात आली आहे आणि ती बंगळुरूच्या काही पिनकोडवर सुरू करण्यात आली आहे. फ्लिपकार्टची ही नवीन सेवा लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहे. या सेवेच्या मदतीने 15 मिनिटांत हजारो उत्पादने वितरित केली जातील. यासाठी फ्लिपकार्ट सुमारे 100 डार्क स्टोअर्स देखील चालवणार आहे. त्यामुळे कंपनी लवकरच देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू करू शकते.फ्लिपकार्ट अनेक दिवसांपासून भारतात क्विक-कॉमर्स सेवा सुरू करण्याच्या तयारीत होती. कोविड महामारीपासून, बाजारात क्वी-कॉमर्स सेवेची मागणी वेगाने वाढली आहे. Flipkart Minutes सर्विस बाजारात Instamart आणि Blinkit सारख्या सर्विसशी स्पर्धा करेल.