फोटो सौजन्य - yusuf dikec (X)
गेल्या काही दिवसांपासून पॅरिस ऑलिंपिकमुळे चर्चेत असणारा तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेक आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण आता त्याने X वर केलेल्या त्याच्या पोस्टमुळे तो चर्चेत आला आहे. तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेकने X अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने X चा मालक Elon Musk ला एक प्रश्न विचारला आहे. तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेकची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून त्याच्या या पोटवर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
हेदेखील वाचा- आश्चर्यकारक! रोबोट करणार किडनी ट्रांसप्लांट; अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये झाली सुरुवात
पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेला तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेक स्पर्धेतील त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे चर्चेत आहे. स्पर्धेतील त्याची खास स्टाईल लोकांना प्रचंड आवडली आहे. स्पर्धेत भाग घेतल्यानंतर शूटिंग करताना त्याने सामान्य चष्मा घातला होता आणि एक हात खिशात ठेवला होता. त्याची ही स्टाईल सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. त्याने त्याच्या खास शैलीत नेमबाजी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. खास स्टाईल आणि विजयामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच आता युसूफ डिकेकने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्याने टेस्लाचा सीईओ आणि X चा मालक Elon Musk साठी केली आहे. युसूफ डिकेकने पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, हाय Elon, भविष्यात एखादा रोबोट खिशात हात ठेवून ऑलिम्पिक पदक जिंकू शकेल असं तुम्हाला वाटतं का? इस्तंबूलमध्ये या विषयावर चर्चा करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
हेदेखील वाचा- नवीन सिमकार्ड खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी सरकारचे अनिवार्य नियम वाचा
पॅरीस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर युसूफ डिकेकने ही पोस्ट केली आहे. युसूफ डिकेकच्या या पोस्टला उत्तर देताना Elon Musk ने म्हटलं आहे की, रोबो प्रत्येक वेळी केंद्र चिन्हांकित करतील. मी इस्तंबूलला जाण्यासाठी उत्सुक आहे. हे जगातील महान शहरांपैकी एक आहे. Elon Musk च्या या उत्तरानंतर तो इस्तंबूलला भेट देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Elon Musk च्या या उत्तरानंतर अनेक यूजर्सच्या प्रतिक्रिया देखील X वर पाहायला मिळत आहेत. यामध्ये एक यूजरने म्हटलं आहे की, हे करताना रोबोट चांगले दिसतील का? यानंतर दुसऱ्या यूजरने एक कमेंट केली आहे की, रोबोट्सना आपापसात भांडायला लावायला खूप मजा येईल, कोण किती दिवस टिकेल हे बघता येईल.
Elon Musk रोबोट आणि AI क्षेत्रात प्रचंड प्रगती करत आहे. काही दिवसांपूर्वीच Elon Musk ने घोषणा केली होती की तो 1 लाख चिप्सचा वापर करून जगातील सर्वात पावरफूल AI तयार करणार आहे. X चे AI स्टार्टअप xAI ने त्याच्या लार्ज लँग्वेज मॉडेल, Grok चे प्रशिक्षण सुरू केले आहे. Elon Musk ने दावा केला आहे की, Grok हा जगातील सर्वात शक्तिशाली AI प्रशिक्षण क्लस्टर असणार आहे. शक्तिशाली AI ची चर्चा सुरु असतानाच आता Elon Musk ने युसूफ डिकेकला रोबोट तयार करण्याबाबत उत्तर दिलं आहे. त्यामुळे Elon Musk इस्तंबूलला भेट देऊन नेमबाजी करू शकेल असा रोबोट तयार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.