यूट्यूबच्या माजी सीईओ Susan Wojcicki यांचे निधन (फोटो सौजन्य- pinterest)
यूट्यूबच्या माजी सीईओ Susan Wojcicki यांचे शनिवारी 10 ऑगस्ट रोजी निधन झालं. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा कॅन्सरसारख्या आजाराशी सुरू असलेला लढा अखेर अयशस्वी ठरला आहे. याबबात Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी Susan Wojcicki यांच्या निधनाबाबत सांगितलं. सुंदर पिचाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. यूट्यूबच्या विकासात Susan Wojcicki यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. Susan Wojcicki या 56 वर्षांच्या होत्या आणि 2 वर्षांपासून फुफ्फुसाच्या कर्करोगाशी लढा देत होत्या. या संदर्भात Susan Wojcicki चे पती आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- Microsoft च्या सेवा का झाल्या होत्या ठप्प; कारण आलं समोर, Crowdstrike ने दिलं स्पष्टीकरण
Susan Wojcicki चे पती डेनिस ट्रॉपर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, Susan Wojcicki च्या निधनाची बातमी मी अत्यंत दुःखाने शेअर करत आहे. माझी पत्नी आणि आमच्या पाच मुलांची आई, नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सरशी सुरू असलेल्या दोन वर्षांच्या लढाईनंतर आज आम्हाला सोडून गेली.
सुंदर पिचाई यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, दोन वर्षे कर्करोगाने ग्रस्त असलेली माझी प्रिय मैत्रीण Susan Wojcicki आम्हाला सोडून गेली. मी खूप दुःखी आहे. ती Google च्या इतिहासातील इतर कोणत्याही व्यक्तीइतकीच महत्त्वाची आहे आणि तिच्याशिवाय जगाची कल्पना करणे कठीण आहे. ती एक अविश्वसनीय व्यक्ती, लिडर आणि मैत्रीण होती. जिचा जगावर जबरदस्त प्रभाव पडला आणि मी अगणित गुगलर्सपैकी एक आहे ज्यांना असे म्हणता येईल की ते Susan Wojcicki ला ओळखत होते. ती Google च्या सुरुवातीच्या कर्मचाऱ्यांपैकी एक होती आणि AdSense तयार केल्याबद्दल तिला ‘Google संस्थापक पुरस्कार’ मिळाला होता. आम्हाला तिची खूप आठवण येईल. तिच्या कुटुंबाप्रती आमच्या संवेदना. भावपूर्ण श्रद्धांजली Susan Wojcicki.
हेदेखील वाचा- Instagram युजर्ससाठी लाँच झालं नवीन अपडेट! आता एकाच वेळी 20 फोटो-व्हिडिओ शेअर करू शकणार
Susan Wojcicki यांनी YouTube च्या CEO म्हणून कार्यरत असताना, प्लॅटफॉर्म जागतिक पॉवरहाऊसमध्ये वाढला, ज्यामुळे लाखो कंटेट क्रिएटर्स आणि अब्जावधी दर्शकांवर परिणाम झाला. Susan Wojcicki यांनी 2014 ते 2023 च्या सुरूवातीपर्यंत अल्फाबेटच्या उपकंपनी YouTube चे नेतृत्व केले. Susan Wojcicki यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये Google च्या मालकीची कंपनी सोडल्यानंतर भारतीय-अमेरिकन नील मोहन यांना YouTube चे नवीन CEO नियुक्त करण्यात आले.
Susan Wojcicki यांनी 1999 मध्ये गुगल जॉईन केले आणि यूट्यूबच्या अनेक वर्षांपूर्वी वेब सर्च लीडरच्या काही कर्मचाऱ्यांपैकी एक बनल्या. गुगलने 2006 मध्ये यूट्यूब 1.65 बिलियन डॉलरला खरेदी केले होते. 2014 मध्ये YouTube चे CEO म्हणून पदभार हाती घेण्यापूर्वी Susan Wojcicki Google मधील जाहिरात उत्पादनांसाठी वरिष्ठ कार्यकारी पदावर कार्यरत होत्या. कौटुंबिक, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्पांवर’ लक्ष केंद्रित करण्यासाठी 2023 मध्ये Susan Wojcicki यूट्यूबच्या सीईओ पदावरून पायउतार झाल्या.