Microsoft डाऊनचं कारण आलं समोर (फोटो सौजन्य - pinterest)
19 जुलै रोजी झालेल्या ग्लोबल आउटेजमधून अद्याप Microsoft कंपनी सावरली नाही. Microsoft ला आउटेजमधून सावरण्यसाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे. यामध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. 19 जुलै रोजी जगभरातील Microsoft सेवा ठप्प झाल्या होत्या. Windows वर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि संगणक ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले होते. यावेळी युजर्सना त्यांच्या स्क्रिनवर केवळ एक निळ्या रंगाची स्क्रीन दिसत होती. याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला होता. मायक्रोसॉफ्ट डाऊनमुळे डिगो एअरलाइन्सची सुमारे 200 उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
हेदेखील वाचा- Microsoft युजर्सवर पुन्हा एकदा CrowdStrike अटॅक होण्याची शक्यता; कंपनीकडून अलर्ट जारी
बँकांची कामं देखील ठप्प झाली होती. विमान कंपन्या, दवाखाने, कॉर्पोरेट ऑफीस, अशा अनेक ठिकाणांची कामं मायक्रोसॉफ्ट डाऊनमुळे ठप्प झाली होती. मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम संपूर्ण जगावर परिणाम झाला होता. या घटनेला 15 ते 20 दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप मायक्रोसॉफ्ट आउटेजचा सामना करत आहे. मायक्रोसॉफ्टला या आउटेजमधून सावरण्यसाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे. या संपूर्ण घटनेनंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत मायक्रोसॉफ्ट डाऊनचा संपूर्ण दोष CrowdStrike ला दिला होता. त्यानंतर आता CrowdStrike कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. CrowdStrike च्या Falcon सेन्सरमधील सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे संपूर्ण जगाला मायक्रोसॉफ्ट डाऊनचा सामना करावा लागला, असं कंपनीने म्हटलं आहे.
सायबर सुरक्षा कंपनी CrowdStrike ने त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये कुठे आणि काय चूक झाली याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या सर्व समस्येला Falcon सेन्सर जबाबदार आहे. Falcon सेन्सर हे सायबर हल्ल्यांपासून संगणकांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले एक आवश्यक सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर सायबर फ्रॉड करणाऱ्या हॅकर्सकडून आलेल्या धमक्या ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी प्रगत AI चा वापर करते. हे फीचर सुधारण्यासाठी, फेब्रुवारीमध्ये एक नवीन फीचर जोडण्यात आले होते, ज्यामध्ये त्रुटी होती.
हेदेखील वाचा- Microsoft साठी ग्लोबल आउटेजमधून सावरणं झालं कठीण; कंपनीने डेल्टावर केले आरोप
कंपनीने सांगितलं आहे की, सुरुवातीला नवीन फीचर अपेक्षेप्रमाणे काम करत होते, मात्र जुलैमध्ये या फीचरमध्ये समस्या निर्माण झाली. जुलैमध्ये कंपनीने जारी केलेल्या अपडेटमध्ये एक गंभीर त्रुटी समोर आली, ज्यामुळे मायक्रोसॉफ्टला मोठ्या आउटेजला सामोरे जावे लागले. या अपडेटने Falcon सेन्सर्सना चुकीची माहिती दिली, ज्यामुळे हे सेन्सर क्रॅश झाले. याचा परिणाम जगभरातील Windows वर चालणाऱ्या लॅपटॉप आणि संगणकांवर झाला. लाखो विंडोज संगणकांवर ब्लू स्क्रीन दिसू लागली. विमान कंपन्या, दवाखाने, कॉर्पोरेट ऑफीस अशा अनेक ठिकाणांची कामं मायक्रोसॉफ्ट डाऊनमुळे ठप्प झाली होती. मायक्रोसॉफ्ट डाऊनचा परिणाम संपूर्ण जगावर परिणाम झाला होता.
CrowdStrike ने या मुद्द्यावर आपली चूक मान्य केली आहे आणि अशा घटना रोखण्यासाठी अनेक बदल करण्याबाबत कठोर पावलं उचलणार असल्याचं सांगितलं आहे.यामध्ये, सॉफ्टवेअर अपडेट्सची चाचणी अधिक कठीण करण्यावर भर देण्यात येणार आहे.