फोटो सौजन्य - सोशल मिडीया
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी JIO ने टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केले. JIO कंपनीचे बदललेले टॅरिफ प्लॅन 3 जुलैपासून देशभरता लागून करण्यात आले. मात्र निर्णयानंतर JIO युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. कंपन्यांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक युजर्स BSNL कडे वळले. JIO, Airtel आणि VI या कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांची BSNL ला पंसती मिळाली.टॅरिफ प्लनच्या बदलानंतर आता पुन्हा एकदा JIO ने वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये देखील बदल केले आहेत. पण हे बदल JIO युजर्ससाठी नक्कीच फायदेशीर ठरतील, असा दावा कंपनीने केला आहे. टॅरिफ प्लनच्या बदलानंतर नाराज असलेल्या JIO युजर्ससाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
JIO चे वार्षिक प्लॅन्स 3599 रुपये आणि 3999 रुपयांचे आहेत. टॅरिफ प्लॅनच्या वाढत्या किंमतींमुळे अनेक युजर्स वार्षिक रिचार्ज वापरणं फायदेशीर समजतात. आता JIO वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये देखील बदल केले आहेत. 3599 रुपये आणि 3999 रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये आता युजर्सना JioTV, JioCinema आणि JioCloud हे अॅप देखील मिळणार आहेत. त्यामुळे युजर्सना या अॅप्ससाठी वेगळा रिचार्ज करण्याची किंवा या अॅप्सची विशेष मेंबरशिप घेण्याची गरज नाही. युजर्सना वार्षिक रिचार्जमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud या अॅप्सची सुविधा मिळणार आहे.
Jio च्या 3599 च्या वार्षिक रिचार्जची किंमत यापूर्वी 2999 रुपये होती. मात्र 3 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या नव्या दरानुसार युजर्सना हा वार्षिक रिचार्ज आता 3599 रुपय़ांना खरेदी करावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सुविधा, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2.5GB डेटा मिळेल. याशिवाय तुम्हाला 5G डेटा विना लिमिट वापरता येईल. तसेच JioTV, JioCinema आणि JioCloud देखील मिळेल. हा प्लॅन संपूर्ण वर्षासाठी व्हॅलिड असेल.
Jio च्या 3999 च्या वार्षिक रिचार्जची किंमत यापूर्वी 3599 रुपये होती. मात्र 3 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या नव्या दरानुसार युजर्सना हा वार्षिक रिचार्ज आता 3999 रुपय़ांना खरेदी करावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सुविधा, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2.5GB डेटा मिळेल. याशिवाय तुम्हाला 5G डेटा विना लिमिट वापरता येईल. तसेच fan code, JioTV, JioCinema आणि JioCloud देखील मिळेल. हा प्लॅन देखील संपूर्ण वर्षासाठी व्हॅलिड असेल. दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो.
Jio 3 जुलैपासून टॅरिप्लॅनमध्ये 22 टक्के दरवाढ केली आहे. रिलायन्स जीओचा मूळ प्लॅन 155 रुपयांचा आहे,ज्याची किंमत आता वाढून 189 रुपये झाली आहे. तथापि या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल. दुसरा प्लॅन आहे 209 रुपयांचा ज्याची किंमत वाढून 249 रुपये करण्यात आली आहे. अनलिमिटेड 5G डेटा देणाऱ्या 239 रुपयांच्या प्लॅनची किंमत आत 299 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.