Google Pixel 10 आणि Pixel 11 मध्ये असणार 100x झूम सपोर्ट कॅमेरा, अनेक AI फीचर्सने सुसज्ज
टेक कंपनी गूगलने अलिकडेच त्यांची नवीन सिरीज Google Pixel 9 लाँच केली आहे. या सिरीजच्या यशस्वी लाँचिंगनंतर आता गूगलने आपल्या नेक्स्ट जनरेशन सीरिजवर देखील काम सुरु केलं आहे. Google Pixel 10 स्मार्टफोन AI आणि अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह लाँच केला जाणार आहे. या सिरीजची विशेषत: त्याचा कॅमेरा असणार आहे. सिरीजच्या कॅमेरामध्ये अनेक अपग्रेड समाविष्ट असतील. ही सिरीज 2025 मध्ये लाँच केली जाऊ शकते. याशिवाय Pixel 11 सिरीजचे काही स्पेसिफिकेशन देखील समोर आले आहेत.
हेदेखील वाचा- Nokia ने लाँच केला नवीन 4G फीचर फोन! 1000 mAh बॅटरी आणि 2 इंच डिस्प्लेने सुसज्ज
गूगलची सर्वात प्रगत फ्लॅगशिप Pixel 9 सिरीज अलीकडेच लाँच झाली आहे. आता कंपनीने Google Pixel 10 सीरीज या नेक्स्ट जनरेशन पिक्सेल फोनवरही काम सुरू केले आहे. लाँच करण्यापूर्वी, Google Pixel 10 आणि Pixel 11 संदर्भात काही स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. आगामी Pixel फोन Tensor G5 आणि G6 चिपसेटसह लाँच केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये कॅमेरा आणि AI फीचर्सबाबत अनेक अपग्रेड दिले जातील. दोन्ही सिरीजमध्ये आणखी नवीन गोष्टी देखील जोडल्या जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – X)
अहवालात असे म्हटले आहे की गूगलची Pixel 10 सिरीज कॅमेराच्या बाबतीत अनेक मोठ्या बदलांसह लाँच होऊ शकतो. फोन 4K 60fps HDR व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतील. Pixel 9 लाइन-अपमध्ये ही व्हिडिओ रेकॉर्डिंग क्षमता फक्त 30 fps आहे. Google Pixel 10 सिरीज व्यतिरिक्त, अहवालात Google Pixel 11 लाइनअपचा देखील खुलासा करण्यात आला आहे. Pixel 11 व्हिडिओ आणि फोटोंसाठी मशीन लर्निंगद्वारे 100x झूम क्षमता प्रदान करू शकते.
यामध्ये नेक्स्ट जनरेशनचा टेलिफोटो कॅमेरा असेल, जो 100x पर्यंत झूमला सपोर्ट करेल. अशा परिस्थितीत कॅमेरा हार्डवेअरमध्ये बदल अपेक्षित आहेत. सिनेमॅटिक ब्लर वैशिष्ट्याला 4K 30fps आणि नवीन ‘व्हिडिओ रिलाइट’ वैशिष्ट्यास समर्थन देण्यासाठी Google Pixel 11 वर अपग्रेड देखील मिळत आहे. अहवालात असे म्हटले आहे की हे वैशिष्ट्य Google Pixel 8 आणि Pixel 9 सिरीजसारख्या क्लाउड-आधारित ऐवजी डिव्हाइसवरील व्हिडिओंवर प्रक्रिया करेल.
हेदेखील वाचा- 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात गूगलला मोठा झटका, ठोठावला 21 हजार कोटींचा दंड
गुगल नेक्स्ट जनरेशन पिक्सेल फोन्समध्ये AI ची व्याप्ती वाढवणार आहे. यामध्ये अनेक नवीन AI फीचर्स देण्यात येणार आहेत. त्यात एलएलएम आधारित स्पीक-टू-ट्वीक एडिटिंग टूल उपलब्ध असेल. याशिवाय, आजकाल गुगल जेमिनी प्रोजेक्ट अंतर्गत स्केच-टू-इमेज फीचरवर देखील काम करत आहे. कंपनी मॅजिक मिरर फीचरवर देखील काम करत आहे. ज्याबद्दल सध्या फारसा तपशील आलेला नाही.
Google Pixel 11 सीरीजला परफॉर्मन्ससाठी Tensor G6 चिपसेट मिळेल. हा चिपसेट इमेज सिग्नल प्रोसेसर आणि अंडर डिस्प्ले IR कॅमेरा सिस्टमसह येईल. तसेच, हे कमी प्रकाशाच्या स्थितीत फेस अनलॉकला सपोर्ट करेल. Pixel 10 सिरीज पुढील वर्षी आणि Pixel 11 मालिका 2026 मध्ये लाँच होऊ शकते.